Adi's Journal

Pieces of my thourhgs

डाव बुद्धिबळाचा

बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही.

पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास,

याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास.

पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला

पायाखालचा रस्ता माझ्या, उजळून सोपा केला.

लगेच हाती प्रलय घेऊन, केलीस पुढची खेळी,

मनूच्या नावेत बसून निसटला बघ तुझा बळी.

तुच्छ कटाक्ष टाकलास, कालचक्र माझ्यावर सोडून,

काळालाच मोडूनतोडून मी क्षण क्षण घेतला जागून.

माझा आत्मविश्वास मारू पाहिलास काही चमत्कारांनी,

पण तुझा वजीरच खाल्ला माझ्या एका प्याद्यानी.

मृत्यूचा शह देऊन तुला वाटलं, आता सारं जिंकलं,

देह नेतोस तर ने म्हणत मी आत्म्याला वाचवलं.

तू आता चाचप व्यूह, निरखून दिशा दाही.

Related Posts

Leave a Reply