Your cart is currently empty!
Category: कॅलीडोस्कोप
तात्या
तात्या, परखड रोखठोक पण काळजाच्या जवळच्या गोष्टी निघाल्या की तितकाच हळवा होणारा. आपले अंतरंग काहीही हातचे नं राखता आपल्या लिखाणातून मांडणारा. वास्तविक तात्याला कधीच प्रत्यक्षात भेटायचा योग आला नाही. फेसबुकावर ओळख झाली तीच मुळात एका उत्तम लेखामुळे. त्या क्षणापासून असा एकाही लेख तात्यानी लिहिला नसेल जो मी वाचला नाहीये. (जुने लेख सोडून द्या तात्या…). माझ्या…
मानसी तू लिहितेस पण?
मानसी, कधीही वाटलं नव्हतं आपण भेटू, आणि एक दृढ मैत्री, एक भावा-बहिणीचं घट्ट नातं विणले जाईल. कधी भेटलो कसे भेटलो हा भाग आपल्यासाठीच ठेवू. वास्तविक तू छान गातेस, भरपूर वाचतेस इतकं माहित होतं. पण मला आत्ता सांगायची आहे ती आठवण खूप वेगळी आहे. मला अजून आठवतो तो तू लिहिलेला सुरेश भटांवरचा लेख. अगदी त्या क्षणापर्यंत…
धावपळ पडद्यामागची
स्नेहसंमेलन म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो जल्लोष, उत्साह, बेभान होऊन काम करणारे हौशी कलाकार आणि बऱ्याचदा त्यांची टर उडवणारे प्रेक्षक. काय वाटेल ते करतात काय विचारू नका. खुर्च्यांवर उभे राहून जा जा असे हातवारे करणं, ग्रुप मध्ये उठून कवायती करणं. एकाच वेळी सगळ्यांनी मागेच काय बघायला लागणं. काही विचारू नका. या सगळ्या गोंधळात खरा कस…
नीरज – मनाच्या कोपऱ्यातला
कुठल्या आठवणी कधी जाग्या होतील सांगता येत नाही. वास्तविक शाळेच्या दिवसातल्या लक्षावधी आठवणी मनात दाटून आल्या पण मन स्थिरावलं ते शनिवार वर. शनिवारी आम्हा मित्रांचं ठरलेलं काम. नीरजला जाऊन शाळेत जाण्यासाठी उठवायचं. त्या ६ वर्षांत नीरज शनिवारी आपणहून आधी उठल्याच मला आठवत नाही. आम्ही सगळे मित्र त्यासाठी जास्त लवकर उठायचो. आवरून सावरून सायकली पिटाळत त्याच्या…
बऱ्याच वर्षांनंतर
खूप वर्षानंतर अचानक फेसबुक वर पुन्हा भेट व्हावी आणि मैत्रीचे नाते पुनश्च बहारावे असा अनुभव खूप लोकांना आला असेल. माझ्यासाठी हा अनुभव खूप खास. तशी आमची ओळख प्राथमिक शाळेतली. मध्यंतरीच्या काळात पुलाखालून खूप पाणी वाहून गेले. अर्थात साहजिकच आहे म्हणा, १५ वर्षांनी पुन्हा बोलणं होत होतं. बऱ्याच वर्षांच्या साचलेल्या आठवणींना पाझर फुटला आणि मनाचे धागे…
कॅलीडोस्कोपच्या निमित्तानी
मित्रांनो, कोणाकोणाशी गप्पा मारताना कुठले विषय मनात काय तरंग निर्माण करतील याचा अंदाज कधीच लागत नाही. मागे असाच गप्पा मारत असताना कॅलीडोस्कोपच्या पहिल्या भागाचा धागा सापडला आणि मी लिहिता झालो. त्याबद्दलच दोन दिवसांनी आम्ही परत बोलत होतो तेव्हा पुढील काही धागे सापडत गेले आणि कॅलीडोस्कोपचा दुसरा भाग तुमच्यासमोर मांडला. पहिले दोन भाग झाले ते केवळ…