विचारले तिला…

विचारले मी तिला, पाऊस कसा पडतो अवेळी.
कपाळीचे दोन घर्मबिंदु झटकून ती उत्तरली.

असंच विचारले होते ह्या कडाडणाऱ्या वीजा का खेचल्या धरणीने.
माझ्या नजरेस नजर भिडवून, हळूच नजर चोरली तिने.

अलगद चेहऱ्यावर घेतली काळ्याभोर केसांची बट.
रोजची संध्याकाळ अशी सावळी का हे विचारले तेव्हा.

अन् आता बरसलय मोत्यांच हास्य माझ्यावर,
काव्यातला गोडवा तिने समजावला तेव्हा.

Leave a Reply

%d bloggers like this: