Category: कविता

  • गजांची खिडकी

    गजांची खिडकी

    PicsArt_05-13-11.33.48.jpg
    Painting by Snehal Ekbote

    या बंद कोठडीला आहे एकच खिडकी,
    वर उंच, आणि गजांनी बंद असलेली.
    दिसत नाही काहीच मला त्यातून, पण…
    ऐकू येतात मला आवाज अनेक.
    दिवस सुरू होता होता कोठडीतील अंधार पालटायच्या आधी
    मला जाग येते ती किलबिलाटानी,
    बहुदा कोपऱ्यावर एक डेरेदार वृक्ष असावा
    ज्यावर असावीत बांधली घरटी असंख्य पक्षांनी.
    थोड्याच वेळात किलबिलाटाची जागा घेतात ते मोटारींचे आणि दुचक्यांचे आवाज नि कर्कश भोंगे.
    मग इथलाही दिवस सुरू होतो आणि
    जणू आकाशवाणीचे सभा संपावी तशी या रेडिओ पासून आमची ताटातूट होते, ती पुन्हा संध्याकाळच्या सभेत भेट होण्यासाठी.
    वाहनांचे आवाज कमी कमी होत जातात आमची जेवणं उरकून दिवे मालवले जाई पर्यंत.
    आणि उरतात माझ्या सोबतीला रातकिड्यांचे, दूर भुंकणाऱ्या कुत्र्याचे आणि वटवाघळांच्या फडफडण्याचे आवाज.
    आणि आलीच तर चंद्रप्रकाशाची एखादी तिरीप.
    कारण, माझ्या बंद कोठडीला आहे एकच खिडकी,
    वर उंच, आणि गजांनी बंद असलेली.
    ज्यातून दिसत काहीच नाही, पण ऐकू येतं, बाहेरचं सारं जग…
    ~~~
    आदित्य साठे
    १३-०५-२०२०


    गजांची खिडकी, Adi’s Journal च्या YouTube Channel वर

     

     


    ही कविता मला सुचली ती स्स्नेनेहल एकबोटे या माझ्या चित्रकार मैत्रिणीच्या या चित्रावरून. स्नेहल एक उत्तम छायाचित्रकार देखील आहे. तिची चित्रे व छायाचित्रे तुम्ही तिच्या instagram handle वर जाऊन बघू शकता…

  • ठरलेच होते…

    ठरलेच होते…

    PicsArt_03-27-12.05.27.jpg

    वेगळे हे चालणे ठरलेच होते
    आपले हे वागणे ठरलेच होते

    केवढी ही शांतता दोघांमध्ये या
    अंतराचे वाढणे ठरलेच होते

    जाहली लाही किती ही अंग अंगी
    रात सारी जागणे ठरलेच होते

    काय सांगू मी कहाणी आज माझी
    शेवटी मी हारणे ठरलेच होते

    चालली होती विजांची तानबाजी
    ती समेवर थांबणे ठरलेच होते

    ठेवला विश्वास मी बोलांवरी त्या
    तो मला मग टाळणे ठरलेच होते

  • मन आज़ाद है…

    मन आज़ाद है…

    PicsArt_10-04-04.01.28
    Sunset colors, Photo by Aditya

    मन आज़ाद है।
    भलेही पैरोमें पड़ी है बेड़ी, वास्तविकता की,
    फिरभी वह आज़ाद है।

     

    अपने आपको सूक्ष्म करके, खिसक जाता है,
    इस जालीदार पिंजरेसे,
    ऊंचा उड़ता है, किसी बाज़की तरह।
    अपनी पैनी तीखी नजरे नीचे जमींके हालतपर जमाए हुए घूमता रहता है।

    कभी अचानकसे एक मंझे हुए गोताखोरकी तरह झपट्टा मारता है, और फिर उड़ जाता है अपनी शिकार को पैरोंमें फसाए हुए।
    कभी यह शिकार होती है किसी हदसेकि जो कोई कहानी बनके उतर आती है कागज़पे,
    तो कभी कोई बेचैनी पकड़ी जाती है उन मजबूत पैरोंतले जिसका दर्द कोई कविता का रूप ले लेता है।

    जब सांझ होती है और आसमान हल्का गुलाबी, केसरिया हो जाता है, तो बाज़ लौट आता है।
    इसी जालीके पिंजरेसे होते हुए जब अंदर आता है,
    तब वहां, सिर्फ एक मानवी शरीर मिलता है, भावनाओसे सराबोर…

  • चलनी नोटेस…

    चलनी नोटेस…

    सये तुझ्याविण चालत नाही संसाराचे गाडे,
    तू नसतांना आमुचे सारे काम आज हे अडे.

    पाच दहा ते दोनहजारी, ल्याली सारी रूपे,
    कधी शंभरी सोबत घेऊन काम करी तू पुरे.

    वजन ठेवता कामावर तू, पाय त्यास हो फुटे,
    वजन वाढता अवजड होते, आम्हा उगीच वाटे.

    हात बदलशी सारखेच तू, शांत कधी ना बसे,
    नसता जवळी कधी कुणाच्या, त्याचे होई हसे.

    येई सत्ता, थोडी मत्ता, साथ तुझी जर असे,
    झिंग तुझी जर जादा होता, विवेके गेला दिसे.

    नतमस्तक मी होतो सखये, बघूनी लीला साऱ्या,
    या जगतावर तुझीच चाले, एकछत्री ही माया.

  • द्वंद

    द्वंद

    PicsArt_04-11-07.48.07.jpg

    एक अथक द्वंद्व सुरू आहे माझ्या मनात,
    अगदी अनादी काळापासून,
    हा संघर्ष आहे तुझ्या माझ्यातला,
    कळत नाहीये की तो आहे माझ्याशीच माझा.

    सतत दिसून येतं डावं ऊजवं,
    जणू बसलं आहे लावून स्वताच्याच पाठीला पाठ,
    संवाद तोडून कुढतं कधी मनातल्या मनात.
    कधी कधी जेव्हा डोळे उघडतात,
    तेव्हा विचारावंसं वाटतं,
    हेच द्वंद्व सुरू आहे का तुझ्याही मनात?



    English translation

    ~~~~~

    There’s a tussle in my mind,
    Continuing since eternity,
    Tussle’s between you and me,
    Or is it, me versus me?

    I witness right and left
    sitting back to back all the time,
    Looking inward, immersed in silence.
    But whenever I open my eyes,
    I always wanted to ask,
    Is the same tussle is troubling you?


    Painting artist Snehal Ekbote.

     

  • कुतूहल

    कुतूहल

    textgram_1552459480
    मनातल्या बागेला मायेचं कुंपण.
    बागेतल्या फुलाफळांची करायचं राखण
    कुणा ढोराचं भय नाही,
    ना कुणा चोराचं.
    कुतूहल नावाचं एक बारीक पिल्लू,
    बिनधास्त बागडायचं त्या बागेत.
    कुंपणाच्या बाहेर काय आहे बघायला उड्या मारायचं,
    धडपडायचं.
    कधी कुंपणावर आपटायचं, लागायचं,
    पण कुतुहलच ते, ते कधीच नाही थांबायचं.
    त्याला खुणावायचं ते जे कुंपणाबाहेर असायचं.
    दिसामागून दिस गेला, मासामागून मास,
    वर्षे सारत कुतुहलसुद्धा वाढले मोठेच खास,
    एक दिवशी जोर लावून मारली लांब उडी.
    बाग सोडून विश्वाच्या पोकळीत पडली उडी.
    तगमग, धडपड, बडबड, त्रागा, सारं काही झालं.
    पोकळीचा या ठाव घेणं हेच वेड लागलं.
    आठवत नाही,
    तेव्हापासून आजवर, किती सरली वर्ष
    कुतूहलाचा चालूच आहे आपला आपला संघर्ष…



    I have commented about human curiosity about unknown voids of this universe in this poem. The imagery I have used is of a secured garden from which human mind is trying to escape in to the unknowns of this world. Hope you will like it. If you enjoyed this poem and my recitation, please feel free to share, like comment and subscribe to my blog.