संजीवन

क्षणात एका नाव बदलते,
नावासंगे बदले जीवन.
जणू जन्म तो नवा मिळाला,
नवीन आहे माझे मीपण.

माहेरीच्या अंगणातून तो
पाय निघे ना जड तो होऊन.
कर्तव्याची जाणीव ठेऊन,
तरी उचलला पाय स्वताहून,

कोड कौतुके माहेराची
तसेच गोळा केली माया,
सारी येथे पुन्हा पेरली,
नाती ही नवीन रुजवाया.

Leave a Reply

%d bloggers like this: