- राजकारणात सगळेच भ्रष्ट म्हणत म्हणत,
त्यांना सतत शिव्या घालतो,
सिग्नल तोडून पळताना पकडल्यावर,
हळूच एक नोट सरकवतो….
- सगळे हिशोब चालतात इथे
कोणाचा किती टक्का यावर,
सत्यमूर्ती गांधीजी आपले,
निमूट हसतात नोटेवर…
- आघाडीबरोबर पळता पळता,
कधी राज, कधी रण,
सामान्य मात्र भोगतोय,
आश्वासनांच “राजकारण”
- एकाच जागी बसून जरा
आला बघा कंटाळा,
राग पक्षांतर गाऊन जरा
आजमावावा म्हणतो गळा…..
nice 1….