किंमत

कळत नाही किंमत म्हणजे
असते अशी काय गम्मत.
कशाच्या आधारावर ठरते
तुमची आमची असली किंमत

चमचमत्या हिऱ्यासदेखील ,
क्वचित मिळत नाही किंमत
काळ्याकुट्ट कोळश्यालाही
कधी येते प्रचंड किंमत

कधी बाजरी न येऊन त्या
माल घेतो प्रचंड किंमत.
घोटाळ्यांच्या अडून कितीदा
खोटीच दिसते त्याची किंमत.

उंच अशा त्या आकाशाला
कधी पोचते झटकन किंमत
खाली येताना का होते,
कासावाहुनही हळू किंमत.

पाण्याच्या त्या कारंज्यासम
थुइथुइ नाचे बघ ती किंमत.
कोणा उमगले आहे कधी हे
कशी ठरते कोणाची किंमत.

3 thoughts on “किंमत

Leave a Reply

%d bloggers like this: