आपल्या कडून अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टींचा पुढे काय परिणाम होईल याची कधी कधी आपल्यालाच कल्पना येत नाही. त्या वेळी खरतर ती कृती खूपच क्षुल्लक असते, म्हटलं तर नगण्य. आपल्याला माहितीही नसतं आपल्याकडून काय झालाय. आणि आपण पुढे निघून जातो. पुन्हा त्याबद्दल विचारही येत नाहीत. पण त्यानंतर होणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.
जसा काळ पुढे जातो आपली मतं निर्माण होतात, मग ती सामाजिक असोत, राजकीय असोत अगदी कौटुंबिक देखील असोत. पण ती मतं तयार होताना ज्या परिस्थितीत तयार होतात, पक्की होत जातात, ती परिस्थितीची बीजं आपणच कोठेतरी त्या नकळत घडलेल्या घटनेत पेरलेली असतात हे आपल्या लक्षात देखील येत नाही. मनात त्या परिस्थितीबद्दल तेढ निर्माण होते आणि आपण त्यापासून दूर जाऊ लागतो.
अगदीच थोडे असतात ते असे अगदीच थोडे असतात जे परिस्थिती बदलू बघतात. आणि अशांच्याच प्रयत्नातून असे काही तयार होते. बघितला तर अगधी छोटं पण योग्य प्रसार झाला तर अत्यंत प्रभावी. बघा तुम्हाला पटतंय का??
Comprende Amigo…!!!