एकच प्रश्न

आहे सभोवताली
शब्दांत खंड नाही
हृदयात भावनांना
जागा पुरेशी नाही

प्रेमास ना तुटवडा
जगण्यास बंदी नाही
आहेच प्रश्न हा की
तू सोबतीस नाही…
~~~
आदित्य साठे
०५-०८-२०२१

This post is a part of the Blogchatter Half Marathon. Read my earlier story here.

One thought on “एकच प्रश्न

  1. सोबत नाही तरी काय झालं? प्रेमात त्यामुळे अजिबात खंड पडत नाही.

Leave a Reply

%d bloggers like this: