Category: Marathi

  • ऋतुगान – a poem celebrating Marathi seasons

    ऋतुगान – a poem celebrating Marathi seasons

    वसंत ऋतुराज,
    नवा हा वर्षारंभ,
    सृष्टी ही आनंदाने,
    बहरली…

    त्यामागे येतो ग्रीष्म
    त्याचे हो दोन मास
    पहिली सर त्यात
    बरसली…

    आली हो वर्षा राणी,
    गाऊया हर्ष गाणी
    सृष्टीने हिरवाई
    नेसलेली…

    चांदणे घेऊनी हा,
    शरद आला बघा,
    सोबत आली आई,
    आदिशक्ती…

    चाहूल हेमांताची,
    लागते साऱ्यांनाच,
    येई हो जेव्हा थंडी,
    थोडी थोडी…

    शिशिर कडाक्याने,
    अंग हे गारठले,
    अगोठी जागोजागी,
    पेटलेली…

    वर्षाचे बारा मास,
    त्यात हे सहा ऋतू,
    समान संख्या पहा,
    वाटलेली…

    In Maharashtra, we believe that year starts with the month of Hindu calendar Chaitra and goes on for twelve months ending at Falgun (aka, fagun in Hindi). Traditionally, these twelve months are devided in 6 seasons, Vasant (blossoms / spring), Grishma (Season of first rain), Varsha (rains), Sharad (Season of abundance), Hemant (mild winter), Shishir (Chilling time).

    I have tried explaining these seasons in this poem. Hope you like it. Let me know in the comments bellow.


    This post is part of Blogchatter’s CauseAChatter. You can find my other entries to this campaign here.

  • भेट एका चित्र-तपस्वीची

    भेट एका चित्र-तपस्वीची

    दिवाळी अंक, चित्र आणि लेखन या साऱ्या बद्दल अत्यंत दांडगा अनुभव असलेल्या एका महान व्यक्तीची काल भेट घेण्याचा योग आला तो Prose Publications  च्या आमच्या साहित्यकट्ट्याच्या निमित्ताने. श्री. चंद्रमोहन कुलकर्णी, कित्येक वर्षांची चित्र-तपस्या असलेला एक सुंदर कलाकार! अनेक पुस्तकांची मुखपृष्ठे, दिवाळी अंकातील साहित्याला अनुरूप किंबहुना कित्येक वेळा त्या साहित्यातील एक वेगळाच पैलू उजेडात आणणारी चित्रे रसिक वाचकांच्या हातात देणारा हा कलाकार कट्ट्यावर अगदी मनमुराद ऐकता आला. 

    हो, अगदी बरोबर वाचलं तुम्ही. ऐकता आला. चंद्रमोहन जी हे जितके भन्नाट चित्रकार आहेत तितकेच उत्तम लेखक देखील आहेत. त्यांची कुंचला आणि लेखणी, दोन्हीवर जबरदस्त पकड आहे. काल त्यांच्याशी गप्पा मारताना त्यांनी मांडलेला एक विचार मनात घर करून गेला. कित्येकदा साहित्यावर किंवा कथेसाठी चित्र काढताना त्या कथेतील एखादा भाग निवडून त्याच चित्रण होतं. पण या मुद्द्यावर त्यांचं मत मांडताना चंद्रमोहन म्हणाले, “चित्रकाराने कथेलाही काहीतरी द्यायला हवं.” कथेचा आपल्या स्वतःच्या दृष्टिकोनातून विचार करून आपलं काही आकलन त्या चित्रांतून आले तर अधिक कलात्मक निर्मिती होईल. 

    इतर कलांकडे डोळस नजरेने बघत त्यांचा आस्वाद घ्याव, तुमच्या दृष्टिकोनातून तो अनुभव पुढे नेण्याचा प्रयत्न करावा. यातूनच कलाकार म्हणून आपलं भावविश्व समृद्ध होत असतं. कालच्या कट्ट्यावरच्या गप्पांतून चंद्रमोहनजींनी असेच माझ्या भावविश्वाच्या अकाऊंट मधे अजून एक फिक्स डीपॉझिट तयार केले. या नवीन इनव्हेस्टमेंट साठी कट्ट्याला खूप खूप प्रेम!

  • मनातले गांव – Hidden town in my mind

    मनातले गांव – Hidden town in my mind

    I believe that everybody has their own version of Utopia in their mind. For me it’s a small town which we can see around us in real life. Its habitants are also familiar faces. Nothing fancy or extravagant. People are happy and helpful. Courteous and smiling. I always wonder why we don’t experience this in real life.

    This is such a small expectation. But what we see around us is disbelief amongst each other. Grim faces of people walking around. High levels of road rage. Everything lacks a bit of happiness. I tried penning down this feeling in this poem. Hope you have enjoyed it.

    कविता

    माझ्याही मनात आहे
    एक गांव लपलेले,
    तसे दिसायला सारखेच
    आपल्या भोवती असणारे.

    माणसेही त्यातली वाटतात
    तशी ओळखीची,
    बोलतात आपुलकीने,
    करतात मधून चौकशी.

    एक प्रश्न पडतो मला
    उत्तर मात्र मिळत नाही,
    भोवतालची माणसे खरी,
    अशी का वागत नाही?

    Rough translation

    A small town is hiding
    in my mind
    similar in looks
    which is ahead and behind

    People residing there
    have faces familiar
    How are you doing?
    they ask, is everything fair?

    It all seems merry
    but I always wonder
    I don’t see them around
    Why real world is harder.


    I’m taking my blog to the next level with Blogchatter’s My Friend Alexa. My current ranking is 227,020. There are many more poems on my blog. You can check my other posts here.

  • अधीर मन

    अधीर मन

    काजवे सभोवती लक्ष दिवे पेटले,
    अंधारी रानातील वाटेवर पावले.

    वाकुनी नभातूनी डोकावतो चांदवा,
    चालली वनातूनी राधा बघ सुंदरा.

    वाटेच्या शेवटास दूर डोंगरावरी,
    राधेला भेटण्यास वाट पाहतो हरी…

    On my YouTube Channel Adi’s Journal


    This post is a part of the Blogchatter Half Marathon. Read my earlier story here.

  • एकच प्रश्न

    एकच प्रश्न

    आहे सभोवताली
    शब्दांत खंड नाही
    हृदयात भावनांना
    जागा पुरेशी नाही

    प्रेमास ना तुटवडा
    जगण्यास बंदी नाही
    आहेच प्रश्न हा की
    तू सोबतीस नाही…
    ~~~
    आदित्य साठे
    ०५-०८-२०२१

    This post is a part of the Blogchatter Half Marathon. Read my earlier story here.

  • पार

    पार

    गांव चिमुकला एक चांगला, घरटी टुमदार,
    बाजाराच्या रस्त्यावरती आंब्याचा पार.
    दिवस कोणता वेळ कोणती नाही चुकणार,
    पारावरती सदा दिसावी टाळकी ही चार.

    कोठून आले कुठे गेले, सांगा मज सारं,
    चारांपैकी एखादा तरी तुम्हा पुसणार.
    कोणा संगे कोण जोडी अन् भांडण कोणात,
    गावावरती नजर बारकी यांची असणार.

    एके दिवशी काय घडावे वेगळेच पार,
    पारावरती तीनच डोकी, सारे गपगार.
    गांवकरी मग झाडून सगळे पडले कोड्यात,
    चौकडीतली एक कडी ही कोठे असणार.

    साऱ्यांमध्ये चर्चा झाले काय हो असणार,
    पारावराती निरोप आला, गडबड हो फार.
    गांवामधूनी वणव्या जैसी ही पसरे बात,
    आज पहाटे त्याने केला भवसागर पार…

    Photo by Aditya Sathe. Location: Sanskruti Hotel, Nashik