Category: असेच अवचित.. काही चारोळ्या…

one when you are hit by a short burst of poetic creativity

  • प्यार…

    ये प्यार ही है जो दिलमे बसा रहता है,
    जो हर पल हमें झिंदा रखता है.
    क्या फर्क है जो करो इन्सानसे या उपरवालेसे…

  • ओझ्याचा बैल….

    पैश्यामागे धावता धावता,
    जीवच संपत चालला.
    माणसालाच कळलं नाही,
    कधी ओझ्याचा बैल झाला….

  • भूलो समय..

    * हो अगर साथ यारोंका,

    उमंग नयी एक मनमे.

    न सुनाई दे घडीकी टिकटिक,

    दिनमे हो या रातमे….

    *  मनमे जगे हो अरमान कुछ करनेके,

    जितकी की लगी हो प्यास.

    समय न रहे याद फिर उस वक्त,

       न लगे पेटको भूख-प्यास.
  • “राजकारण”? नव्हे हे तर राज का रण….

    • राजकारणात सगळेच भ्रष्ट म्हणत म्हणत,

    त्यांना सतत शिव्या घालतो,

    सिग्नल तोडून पळताना पकडल्यावर,

    हळूच एक नोट सरकवतो….

    • सगळे हिशोब चालतात इथे

    कोणाचा किती टक्का यावर,

    सत्यमूर्ती गांधीजी आपले,

    निमूट हसतात नोटेवर…

    • आघाडीबरोबर पळता पळता,

    कधी राज, कधी रण,

    सामान्य मात्र भोगतोय,

    आश्वासनांच “राजकारण”

    • एकाच जागी बसून जरा

    आला बघा कंटाळा,

    राग पक्षांतर गाऊन जरा

    आजमावावा म्हणतो गळा…..

  • उसने क्षण..

    भोवताली घोंगावतो सारा उदास एकांत,
     
    तुझ्या गावाच्या दिशेने माझी नजर अखंड,
     
    तुझ्याविना कोरडा सारा श्रावण महिना,
     
    दोन क्षण उसने दे तुझ्या कुशीत साजणा….
  • बकुळ फुले…

    चारोळी स्वरूपातील काही सुवासिक फुले आपल्यासाठी….

    * गांगरलेल्या मनात एक अनामिक हुरहूर,
    तिची छटाही दिसत नाही अजूनही दूर दूर.

    * सये कधी तू येशील सांज सरून चालली,
    पहा आली असे वाटे एक फांदी ही हलली.

    * सख्या तुझ्या आठवांची मनामध्ये गर्दी झाली,
    तारे मोजता मोजता सारी रातही सरली.
    तुझी वाट पाहुनिया डोळे माझे रे शिणले,
    एका मिठीसाठी माझे अंग अंग आसुसले.