एकांतात मी तुला बघायचो,
एकटक तिच्याकडे बघताना,

ऐकू यायची ती धडधड,
घालमेल मनाची वाढताना,

वाचले मी डोळ्यातले भाव,
ओठांवर येऊन अडकताना.

अनुभवलंय मूकपणे मी,
अबोल्यातून नातं घडतांना,

सांगणार कसं तुला हे सारं,
या आरशाला आवाज नसताना……

Leave a Reply

%d bloggers like this: