तुज विचारायचे होते…

का आठव येतो आज, मन भावुक माझे होते,
तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते,

का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते,
जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते,

का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते,
ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते,

जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते
का आज मनाने तुही, तहानला चातक होते…

Leave a Reply

%d bloggers like this: