तुज विचारायचे होते…

का आठव येतो आज, मन भावुक माझे होते,
तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते,

का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते,
जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते,

का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते,
ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते,

जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते
का आज मनाने तुही, तहानला चातक होते…

Continue Reading

हा मार्ग शोधतो मी…

textgram_1515906162

कित्येक वर्ष सरली, तुज दूर जाऊनीही,
का आज आठवांशी, निशस्त्र भांडतो मी..

का मोजले मला तू, दुजा कुणी म्हणुनी,
हा विद्ध जाहलेला, तक्रार मांडतो मी..

तू दूर लोटले का, मज आपुले म्हणुनी,
कोडे कसे सुटावे, हा मार्ग शोधतो मी…

Continue Reading

डावास नांव इश्क

WhatsApp Image 2017-10-23 at 10.08.00 AM.jpeg

 

डावास नांव इश्क, जो रंगात येत आहे,
जीवास माझिया मी, दाव्यास लावताहे.

ही खातरी मलाही, हरणार मीच आहे,
रुपास त्या भुलूनी, फासे फितूर आहे,

नजरेसमोर अजुनी, थोडे तिने असावे,
म्हणून खेळतो मी, जरी हारलोच आहे.

Continue Reading

सोहळा

A post shared by wild639 (@wild639) on

 

सडा पडे प्राजक्ताचा,
आज माझ्या ग अंगणी,
बघ कसा दरवळे,
आसमंत सुवासानी.

केले शिंपण मोतीये,
श्रावणाच्या ग सरींनी,
जलबिंदूंचे तोरण
बांधियले पावसानी.

सारी सृष्टीही नटली,
साज ओढ्याचे लेवूनी,
सारा सोहळा बघून,
भरे मन आनंदानी.


Transcript to phonetic roman script

Saḍā paḍē prājaktāchā,
āja mājhyā ga aṅgaṇī,
bagha kasā daravaḷē,
āsamanta suvāsānī.

Kēlē shimpaṇa mōtīyē,
shrāvaṇācyā ga sarīnnī,
jalabindūn̄chē tōraṇa 
bāndhiyalē pāvasānī.

Sārī sr̥ṣṭīhī naṭalī,
sāja ōḍhyāchē lēvūnī,
sārā sōhaḷā baghūna,
bharē mana ānandānī.

Rough English translation (non-poetic)

Today flowers of Prajakta are sprinkled in my courtyard.
Look how air is filled with the mild fragrance.
Showers of Shravan had sprinkled pearls around,
rains have hung festoons of droplets.
mother earth has worn the jewelry of streams.
my mind is full of happiness when I witness this festivity…


I am taking my Alexa Rank to the next level with #MyFriendAlexa and #BlogChatter

 

Continue Reading

अज्ञातसफर

तांबडं फटफटायच्याही आधी, मी निघालो आहे,
पायाखालची वाट सोडून, सरावाचा रस्ता मोडून.

धुक्याची चादर ओढलेल्या किंचित अंधाऱ्या गल्ल्या,
ओढतायत मला, हाक मारतायत खुणावून.

माझीही पावलं आपोआपच वळली, उत्सुकतेने,
मनातल्या साऱ्या शंका खोडून.

नुकतीच उगवतीला केशरी किनार आली,
अन आभाळभर पसरली, अंधाराला चिरून.

अज्ञाताचे पडदे बाजूला सारत त्या गल्ल्या फिरत होतो,
बहुदा, मुळ मानवी स्वभावाला धरून.

माझ्या हिस्स्याचे धुके मनसोक्त पीत होतो,
जोवर मन जात नाही भरून.

उन्हं तापू लागली तशी धुक्याची मखमली चादरही विरली,
गावालाही जाग आली आळोखे पिळोखे देऊन.

अज्ञातातली समाधी भंगली, एकांत संपवला
हे अज्ञात जग ज्ञात असलेल्यांनी धक्का देऊन.

परतीचा प्रवास अन ओळखीच्या खुणांचा शोध सुरु झाला,
उद्याच्या अज्ञातसफरीचा निश्चय करून…

Continue Reading