सुरांचा बाजार

नमस्कार, आज मी आपल्या पुढे पहिल्यांदाच मराठीत एक विषय मांडणारे. सध्या आपल्या सगळ्याच टी व्ही चानेल्सवर संगीताच्या स्पर्धांचा अक्षरशः रतीब घातला जातोय. कोणे एके काळी अत्यंत वरच्या दर्जाच्या असणाऱ्या या स्पर्धा आता टी आर पी च्या नादात आपला दर्जा घालवून बसल्या आहेत. मला अजून पण आठवतं, काय त्या एक एक स्पर्धा होत्या, आणि सगळे स्पर्धा उत्तम गाणारे. आणि त्यांचे मूल्यमापन करायला जुने जाणते संगीत तज्ञ. आजच्या सारखे मतांच्या बाजारात निकाल विकले जात नव्हते त्या काळी. अंतिम फेरी तर सगळ्या स्पर्धेचा परमोच्च बिंदूच. परीक्षक सांगतील ते गाणे गा, जमले तर तरलात नाही तर घरी. किती उच्च दर्जाचे गायक त्या स्प्रधांनी आपल्या चित्रपट सृष्टीला दिलेत त्याची गणतीच नाही. सध्या म्हणजे नुसता बाजार भरवला जातो. आणि विजेत्याला भरघोस बक्षिसं वाटून मोकळे. नंतर हे विजेते कधी पार्श्वगायक म्हणून दिसतच नाहीत. सगळा आपला पैशांचा तमाशा होतो आहे. जे जिंकत नाहीत ते मात्र अनेक गाणी गौण जातात चित्रपटांसाठी. आता काय म्हणावे या सगळ्या उपद्व्यापांना देव जाणे. कधी तरी पुन्हा त्या स्पर्धांना त्यांचा पूर्वीचा दर्जा प्राप्त होवो हीच ईश्वर चरणी प्रार्थना करणे आपल्या हाती आहे बाकी काय….

One Comment

Leave a Reply