Adi's Journal

Pieces of my thourhgs

मी रमलो…

textgram_1526036840

तू जवळी नसता सखये, आठवांमध्ये मी रमलो,
मी उघड्या नयनांनेही, स्वप्नांच्या नगरी रमलो

मौनाच्या बुरख्यामागे, माजले मनीं काहूर
हातात हात तू घेता, आश्वासक स्पर्शी रमलो

संध्येस भरे मधूशाला, मद्याची चढली झिंग
तव मिठीगंधाने चढल्या, कैफात सखे मी रमलो

लागली आस मज आता, यापरी काही ना उमजे
वाटते हर पळ पुढचा, सोबती तुझ्या मी रमलो

Related Posts

Leave a Reply