कळणार नाही
वेदनेची तीव्रता तुजला कधी कळणार नाही,
वार जे वर्मी दिले ते घावही दिसणार नाही….
खोल रुतल्या या शरांची, तुजला कधी नव्हती तमा,
चेतल्या ज्या भावना त्या झणी विझल्या पुन्हा,
दोन डोळ्या दाटले ते भावही कळणार नाही….
उचलली समजून मी की जी गुलबाची फुले,
पण तयांना गंध नव्हता फक्त काटे बोचले.
वाहले जे रक्त त्याचा रंगही दिसणार नाही…