जगन्नायका शक्ती दे तुची आता

जगन्नायका किती रे कष्टवितो
किती ही धीराची परीक्षा पाहतो
आता घाव हे सोसता सोसवेना
जगन्नायका शक्ती दे तुची आता
 
पहा हे कसे दैत्य उत्कार्शी गेले
सदा खाउनी सर्व संपन्न झाले
पुरा देश बाजरी विक्रीस आला
जगन्नायका शक्ती दे तुची आता
 
जगन्नायका लोकही अंध झाले
श्रुगालांवरी सर्वची सोपविले
निद्रिस्त शक्तीस जागे कराया
जगन्नायका शक्ती दे तुची आता.
 
गजेन्द्रसही सत्वर मोक्ष दिधला
आता तू कसा स्वस्थ निद्रिस्त झाला
जनांमाजी रे वन्ही तो चेतविण्या
जगन्नायका शक्ती दे तुची आता.

Leave a Reply

%d bloggers like this: