घोषवारा

कळेच ना कधी कधी
का असेच व्हायचे,
लोकशाहीच्या राज्यातही
लोकांनीच पिचायचे.

नावाचीच लोकशाही ती
नावापुरते हक्क,
यांच्या मनमानीने सारे
झालेत आता थक्क.

दरवाढीचा भडका सोसत
ट्यक्सदेखील भरायचे,
यांनी मात्र सगळेच नुसते
फुकट चापायचे.

साऱ्या सिस्टीमचाच उडालाय
पुरा बोजवारा.
सर्वात मोठ्ठ्या लोकशाहीचा
हा आहे घोषवारा.

One thought on “घोषवारा

  1. Classic but when and who will rescue all the citizens from such people? From whom we
    can expect minimum good things?

Leave a Reply

%d bloggers like this: