Category: Marathi

  • किंमत

    कळत नाही किंमत म्हणजे
    असते अशी काय गम्मत.
    कशाच्या आधारावर ठरते
    तुमची आमची असली किंमत

    चमचमत्या हिऱ्यासदेखील ,
    क्वचित मिळत नाही किंमत
    काळ्याकुट्ट कोळश्यालाही
    कधी येते प्रचंड किंमत

    कधी बाजरी न येऊन त्या
    माल घेतो प्रचंड किंमत.
    घोटाळ्यांच्या अडून कितीदा
    खोटीच दिसते त्याची किंमत.

    उंच अशा त्या आकाशाला
    कधी पोचते झटकन किंमत
    खाली येताना का होते,
    कासावाहुनही हळू किंमत.

    पाण्याच्या त्या कारंज्यासम
    थुइथुइ नाचे बघ ती किंमत.
    कोणा उमगले आहे कधी हे
    कशी ठरते कोणाची किंमत.

  • बदल

    आपल्या कडून अनपेक्षितपणे घडलेल्या गोष्टींचा पुढे काय परिणाम होईल याची कधी कधी आपल्यालाच कल्पना येत नाही. त्या वेळी खरतर ती कृती खूपच क्षुल्लक असते, म्हटलं तर नगण्य. आपल्याला माहितीही नसतं आपल्याकडून काय झालाय. आणि आपण पुढे निघून जातो. पुन्हा त्याबद्दल विचारही येत नाहीत. पण त्यानंतर होणाऱ्या घटना आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत.

    जसा काळ पुढे  जातो आपली मतं निर्माण होतात, मग ती सामाजिक असोत, राजकीय असोत अगदी कौटुंबिक देखील असोत. पण ती मतं तयार होताना ज्या परिस्थितीत तयार होतात, पक्की होत जातात, ती परिस्थितीची बीजं आपणच कोठेतरी त्या नकळत घडलेल्या घटनेत पेरलेली असतात हे आपल्या लक्षात देखील येत नाही. मनात त्या परिस्थितीबद्दल तेढ निर्माण होते आणि आपण त्यापासून दूर जाऊ लागतो.
    अगदीच थोडे असतात ते असे अगदीच थोडे असतात जे परिस्थिती बदलू बघतात. आणि अशांच्याच प्रयत्नातून असे काही तयार होते. बघितला तर अगधी छोटं पण योग्य प्रसार झाला तर अत्यंत प्रभावी. बघा तुम्हाला पटतंय का??
  • रंग युद्ध

    बेरंग अश्या या दुनियेचा
    रंग हवा तो मी बघतो.
    रंगाचा ज्या चष्मा मी
    डोळ्यांवरती चढवितो.

    रंगांचे त्या युद्ध चालते
    भगव्याशी हिरवा लढतो
    तलवारीसह महान मी,
    लाल हे गर्वाने म्हणतो

    निळा कधी तो एकांडाच
    स्वतंत्र गादीवर बसतो
    निर्वासित गरीब पिवळा
    तोंड दाबून मार खातो.

    पेटलेल्या या युद्धातून
    पाट रक्ताचा वाहतो
    एकंच रंग रक्ताचा त्या
    माणूस का लढत राहतो.

  • आशा

    भर मध्यान वेळेला
    का काळोख दाटला
    माझ्या मनावर का रे
    असा मळभ हा आला.

    कोण्या दुःखाची ही छाया
    सारीकडे पसरली
    तेवढ्यात दूर कुठे
    अशा सुखाची दिसली….

  • मुग्ध

    ओठांवरती हसू तुझिया,
    नयनांमधुनी सोडशी बाण,
    वाऱ्यावरती केस नाचती,
    बघता तुजला नुरते भान….

  • तू क्यों समज़े ना…

    सुना है ये जहाँ
    सजना तेरे बिना
    इस ख़ामोशी की जुबाँ
    जिसे तू क्यों समज़े ना.

    इन लम्होकी ये दूरियाँ
    जैसे गुजरी कई सदियाँ
    बात की है इन आंखोने
    क्यों तुम तक ये पहुचे ना.

    लगी सावन की है जो झडी
    हर अंग जो सुलगाए
    इस सुलगनेकी दासताँ
    क्यों तुमको ये भाए ना.