Category: Marathi

  • मेनका

    मेनका

    प्रचंड उकाड्याची एक ढगाळ संध्याकाळ. उन्हाळ्यातलीच, पण मळभ दाटून आलाय. विनय एकटाच आपल्या खोलीत अंधारातच बसला होता. टेबलवर तासाभरापूर्वी वाफाळता असलेला चहाचा कप आता थंडपणे भरलेला. बाजूला अॅश ट्रेच्या खाचेत बऱ्याच वेळात त्याच्या ओठापर्यंत न पोचलेली सिगारेट जळत जळत फिल्टर पर्यंत पोहोचली होती. तंद्री लागल्यासारखा तो त्या धुराच्या उठणाऱ्या वलायांकडे पाहत होता. समोर टेबलावरच त्याचं रायटिंगपॅड पानं फडफडवत होतं. त्यावर लिहिलेल्या चार शब्दांपलीकडे त्याला काहीही सुचत नव्हतं म्हणा किंवा खूप काही मनात होतं पण ते विचार कागदावर येईपर्यंत मन त्यांचा हात पकडून कुठे तरी लांब पोहोचत होतं. आणि न प्यायलेल्या सिगारेटच्या धुरात विनय त्या विचारांच्या मागे कुठेसा हरवला होता.

    अजून वेळ आहे म्हणता म्हणता लेखाची डेडलाईन परवावर येऊन ठेपली होती. गेले दोन वर्ष एका आघाडीच्या दैनिकासाठी तो दर आठवड्याला एक सदर लिहितोय. (more…)

  • पत्रोत्तर..

    पत्रोत्तर..

    प्रिय,

    परवा तुझं पत्र आलं आणि मन एका क्षणात १५ वर्ष मागे गेलं. तुझी माझी मैत्री आपल्या मॅट्रिकच्या वर्गातली. त्या दिवशी माझ्या बाजूला बसणाऱ्या मुलीचं शाळेत न येणं आणि त्याच दिवशी तुझा शाळेचा पहिला दिवस असणं. अगदी योगायोग. सातारच्या कुठल्याशा शाळेतून बदलून आमच्या शाळेत आलीस. आणि जणू वर्षानुवर्षांची ओळख असल्या सारख्या आपल्या गप्पा रंगल्या. नशीब इतकच की आपली बडबड बघून बाईंनी आपल्याला वेगवेगळ नाही बसवलं. त्या दिवसापासून स्नेह जुळले ते कायमचेच. हा आत्ता मध्ये काही वर्षांचा खंड पडला खरा. पण त्यालाही बऱ्याचप्रमाणात मीच जबाबदार आहे. त्याबद्दल (more…)

  • रिक्त मी

    रिक्त मी

    आज बरोबर वर्ष झालं नाही? अशाच एका धुंवाधार कोसळणाऱ्या पावसात मला सोडून तू परत फिरलास. सवयीप्रमाणे तू गल्लीच्या कोपर्‍यावर दिसेनासा होईपर्यंत मी तशीच दारात उभी होते. तू कोपऱ्यावर वळलास पण मी मात्र तिथेच उभी होते. किती वेळ, माहित नाही. गेले दोन तास तू जो शब्दांचा समुद्र माझ्यासमोर रिता केलास तो आत्ता कुठे माझ्या डोक्यात शिरत होता. खरं तर पहिल्या दोन वाक्यातच माझं डोकं पूर्ण बधीर झालं होतं. अगदी एखाद्या चित्रपटात दाखवतात न तसं. आजूबाजूला एक विचित्र शांतता, डोळ्याच्या समोर धूसर होत चाललेल्या आजूबाजूच्या निशब्द हालचाली. सुन्न मन आणि निर्विकार चेहेरा. खरंच निर्विकार होता का रे? कदाचित अविश्वास डोकावत असेल कुठून तरी. अर्थात तुझ्या लक्षातही आलं नसेल म्हणा. मनानी तू केव्हाच पुढे निघून गेला होतास. मुक्त होतास. ‘आपले’पणाचे बंध कधी तुटले ते मला कळलेच नाही. तुटले, की तू तोडलेस? विचारीन म्हणते कधी भेटलास तर.

    गेले वर्षभर वाटत होतं, गेला आहेस मला सोडून. एका खूप खोल पोकळीमध्ये ढकलून. इतकं खोल की दिवसाचा प्रखर सूर्य पण एखाद्या दूरच्या ताऱ्यासारखा वाटायचा. (more…)

  • त्या वळणावर

    त्या वळणावर

    त्या संध्याकाळी रोजच्यासारखाच मी रामण्णाच्या त्या खास कॅफे मध्ये बसलो होतो. माझ्या अत्यंत आवडत्या अशा कॉफीचा आस्वाद घेत. तशा महत्वाच्या पण फारशी वर्दळ नसलेल्या एका रस्त्याच्या कोपऱ्यावर रामण्णानी त्याचे ‘मद्रास कॅफे’ चालू केले होते. ऑफिस संपल की रामण्णाच्या ‘मद्रास’मध्ये यायचं, रोजचीच ती खिडकीतली जागा पकडायची, आणि बॅगतून पुस्तक काढून वाचत बसायचं. तितक्यात रामण्णा कॉफी घेऊन यायचा. त्या गरम वाफाळत्या कॉफीच्या वासानी दिवसभराचा थकवा कुठल्या कुठे पळून जायचा. मगमधल्या कॉफीने तळ गाठेपर्यंत चांगला अर्धा पाउण तास सहज जायचा. कॉफी संपली की पुस्तक बंद आणि रामण्णाला धन्यवाद आणि पैसे देऊन मी घरच्या वाटेला लागायचो.

    इथे नोकरीला आल्या दिवसापासून असलेले गेल्या चार वर्षांचं हे रोजचं वेळापत्रक त्या मंगळवारनंतर कोलमडणार आहे याची मला किंचितही (more…)

  • आहिस्ता आहिस्ता…

    आहिस्ता आहिस्ता…

    वास्तविक ठरलेली वेळ साडे-सहाचीच, पण नेमकं आज ऑफिसमधलं काम लवकर आटोपलं आणि विराज कॅफेमध्ये चांगला पाउण तास अगोदर पोचला. रीना वेळेआधी पोचण्याचा काही स्कोपच नव्हतं. झालाच तर उशीरच होईल. तसं पाहिलं तर दोनच दिवस आधी त्यांची भेट झाली होती. पण अगदीच थोडा वेळ. आणि कित्येक महिन्यांनी भेटणाऱ्या दोन खास मित्र-मैत्रिणीला तो कसा काय पुरेसा वाटेल. त्यामुळे खूप काही बोलायचं राहून गेलं होतं. शेवटी आज पुन्हा भेटू असं ठरलं, आणि सुदैवानी दोघांनाही ऑफिसला विशेष काम नव्हतं. (more…)

  • नाते जुळले मैत्रीचे
    चुकूनही विटत नाही
    मउसुत धागे रेशमाचे
    घट्ट वीण सुटत नाही.