Category: Marathi

  • गर्भित भाव

    कधीही कळले नाहीत तुजला,
    शब्दांमधले गर्भित भाव.
    माझ्या हरेक श्वासामधूनी,
    दडले आहे तुझेच नाव.

  • वाट

    आयुष्याच्या वाटेवर चालताना
    कुठलंसं वळण येतं
    मागचं सारं मागे सोडत
    नवीन जग समोर येतं….

  • शपथ

    सये नको तू जाऊस
    खेळ मांडला सोडून,
    तुझ्याविना माझा पहा
    श्वास राहतो आडून.

    अशी उठतेस जेव्हा
    खेळ अर्धा टाकून,
    जणू वाटते हा जातो
    जीव शरीर सोडून.

    सखे शपथ ही तुला
    नको जाऊस उठून,
    कोण मांडेल हा डाव
    जर गेलीस मोडून..

  • प्रतिबिंब

    दुसऱ्याला दाखवताना
    कधी त्यालाही वाटते,
    माझेही प्रतिबिंब
    कुणी मला दाखवावे.

  • पाउस आणि तो,

    पावसाची पहिली सर येताच आठवते तुझे हसू,,
    जवळ तू नाहीस बघून डोळ्यात दाटतात आसू….

    —-|||—-

    बाहेर लागलीये पावसाची झड,
    उसंत नाही कायम झरझर.
    संध्येच्या या धुंद एकांतात,
    मनात बरसतेय आठवांची सर.

    —-|||—-

    कुंद धुंद एकांत हा,
    विरहाचा सोबती,
    गुलाबी थंड वर अन,
    एकटा मी एकांती.

    —-|||—-

  • किनारा

    दूर अजुनी किनारा
    ही ओढीची जलधारा
    कसे जावे पैलतीरा
    पाठ फिरावी हा वारा

    त्या पैलतीरावरी
    वाट साजण पाहतो.
    त्या एका भेटीसाठी
    सारा जीव तो झुरतो.