ओठांवरती हसू तुझिया,
नयनांमधुनी सोडशी बाण,
वाऱ्यावरती केस नाचती,
बघता तुजला नुरते भान….
Category: कविता
-
मुग्ध
-
तू क्यों समज़े ना…
सुना है ये जहाँ
सजना तेरे बिना
इस ख़ामोशी की जुबाँ
जिसे तू क्यों समज़े ना.इन लम्होकी ये दूरियाँ
जैसे गुजरी कई सदियाँ
बात की है इन आंखोने
क्यों तुम तक ये पहुचे ना.लगी सावन की है जो झडी
हर अंग जो सुलगाए
इस सुलगनेकी दासताँ
क्यों तुमको ये भाए ना. -
संजीवन
क्षणात एका नाव बदलते,
नावासंगे बदले जीवन.
जणू जन्म तो नवा मिळाला,
नवीन आहे माझे मीपण.माहेरीच्या अंगणातून तो
पाय निघे ना जड तो होऊन.
कर्तव्याची जाणीव ठेऊन,
तरी उचलला पाय स्वताहून,कोड कौतुके माहेराची
तसेच गोळा केली माया,
सारी येथे पुन्हा पेरली,
नाती ही नवीन रुजवाया. -
वणवा
या वैशाख वणव्याची
नाही सोसत काहिली
काळ्या मेघांच्या छायेची
वाट साऱ्यांनी पाहिली.
वाट पाहून पाहून
पाणी डोळ्यांचे आटले.
निसर्गाचे चिडले मन
तेव्हा कुठे ते द्रवले.
-
आँसू
खायी है जख्म गहेरी,
भरा नहीं है घाव अभी.
चेहेरेसे नकाब हसिका,
फिरभी नहीं उतरा कभी.चलते रहे बरसातोमे,
आसुओंको छुपाते हुए.
ना दिखे कभी वो किसीको,
दिलमे यही तमन्ना लिए…. -
धार
शब्दांची ती धार कधीही
चालवणाऱ्या कळतच नाही
झेलाणाऱ्याच्या हृदयावारल्या
जखमा त्याला दिसत नाही.जखमेवरती फुंकर सोडा,
पुनःपुन्हा ते वारच होती.
नाजुकशा वेड्या मनाची,
क्षणात एका शकले होती.विखुरलेली ती शकले सारी,
गोळा करता नवीन घाव.
कसे तुला रे कळतच नाही,
झेलू कुठे हे नवीन घाव.