Category: कविता

  • झुळुक

    सायंकाळी आली दुरुनी,
    झुळुक हवेची मखमाली,
    केसांमधुनी वाट काढता,
    शब्द काहीसे गुणगुणली.

    दूर राहते तुझ्याहून जरी.
    आठवणी त्या मज छळती.
    रात्रंदिन मी वाट पाहते,
    तुझ्या वाटेला विचार की.

    न राहोनी आज या क्षणी
    सांगितले या वाऱ्याला,
    घेऊन जा तू हा सांगावा,
    ये भेटाया सख्या मला.

    इतुके बोलून झुळुक हवेची,
    क्षण एकच तो घुटमळली,
    निमिष संपता मागे फिरुनी
    उत्तर माझे घेऊन गेली.

  • मिलन

    शुभ्र उन्हाचे तुजला कोंदण,
    रात्र काजळी माझे मी पण,
    तिन्हीसांजेच्या भगव्या रंगी,
    तुझे नी माझे झाले मिलन….

  • ओढ

    न थांबता जराही, ती नित्य चालू आहे.
    पांथस्त हा मनीचा, यात्रा करीत आहे.

    सह चालतो म्हणुनी, कित्येक आले गेले.
    परी वाट एकट्याची, एवढेच सत्य आहे.

    थकली ही गात्रे म्हणुनी, घेऊ जरा विसावा.
    उशीर निमिषाचाहि, त्याला अमान्य आहे.

    ती भेट इश्वराची, यात्रान्ती योजलेली.
    या यात्रिकास मनीच्या, त्याचीच ओढ आहे

  • आभी जा…..

    दूर अब रेहके तू क्यू तडपाये रे,
    तुझबिन सुनी मेरी दिन और रैना रे
    आंखोमे जमि है असुओंकी धारा रे,
    आभी जाओ अब मोरे साजना रे.

    चहुघीर आये काले बादल रे
    पर मेरे आंगनमे बिरह की धूप रे.
    प्यार की बरखाको तरसू मै अब रे
    बनके बसंत मेरा जल्दी तू आज रे.

    बिरहा अगनमे पलभी नं जलना रे,
    बस तेरी बाहोंमे मै समा जानी रे,
    ना सताओ काही जान ना जाये रे,
    दुरी ये मिटाओ साजना अब ना सहू रे…

  • शब्दांवरचे ओझे

    शब्दांना नसते दुःख
    शब्दांना सुखही नसते,
    ते वाहतात जे ओझे
    ते तुमचे आमचे असते….

  • तुझे डोळे

    तुझ्या डोळ्यांबरोबरच उगवतीला तांबडं फुटतं,
    डोळे मिटताच सारं विश्व रात्रीत गुडूप होतं.

    तुझे डोळे, कधी निळ्याशार गहिऱ्या डोहासारखे,
    तर कधी उमटतात भाव खळाळत्या लाटांसारखे.

    तुझ्या डोळ्यातच उमलतो माझ्या विश्वाचा पसारा,
    तुझे डोळेच माझ्या जीवनलहरींचा किनारा.