ओढ

न थांबता जराही, ती नित्य चालू आहे.
पांथस्त हा मनीचा, यात्रा करीत आहे.

सह चालतो म्हणुनी, कित्येक आले गेले.
परी वाट एकट्याची, एवढेच सत्य आहे.

थकली ही गात्रे म्हणुनी, घेऊ जरा विसावा.
उशीर निमिषाचाहि, त्याला अमान्य आहे.

ती भेट इश्वराची, यात्रान्ती योजलेली.
या यात्रिकास मनीच्या, त्याचीच ओढ आहे

Leave a Reply

%d bloggers like this: