वास्तविक ठरलेली वेळ साडे-सहाचीच, पण नेमकं आज ऑफिसमधलं काम लवकर आटोपलं आणि विराज कॅफेमध्ये चांगला पाउण तास अगोदर पोचला. रीना वेळेआधी पोचण्याचा काही स्कोपच नव्हतं. झालाच तर उशीरच होईल. तसं पाहिलं तर दोनच दिवस आधी त्यांची भेट झाली होती. पण अगदीच थोडा वेळ. आणि कित्येक महिन्यांनी भेटणाऱ्या दोन खास मित्र-मैत्रिणीला तो कसा काय पुरेसा वाटेल. त्यामुळे खूप काही बोलायचं राहून गेलं होतं. शेवटी आज पुन्हा भेटू असं ठरलं, आणि सुदैवानी दोघांनाही ऑफिसला विशेष काम नव्हतं. (more…)
Author: Adi Sathe
-

डाव बुद्धिबळाचा
बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही.
पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास,
याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास.
पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला
पायाखालचा रस्ता माझ्या, उजळून सोपा केला.
लगेच हाती प्रलय घेऊन, केलीस पुढची खेळी,
मनूच्या नावेत बसून निसटला बघ तुझा बळी.
तुच्छ कटाक्ष टाकलास, कालचक्र माझ्यावर सोडून,
काळालाच मोडूनतोडून मी क्षण क्षण घेतला जागून.
माझा आत्मविश्वास मारू पाहिलास काही चमत्कारांनी,
पण तुझा वजीरच खाल्ला माझ्या एका प्याद्यानी.
मृत्यूचा शह देऊन तुला वाटलं, आता सारं जिंकलं,
देह नेतोस तर ने म्हणत मी आत्म्याला वाचवलं.
तू आता चाचप व्यूह, निरखून दिशा दाही.
-
विचारले तिला…
विचारले मी तिला, पाऊस कसा पडतो अवेळी.
कपाळीचे दोन घर्मबिंदु झटकून ती उत्तरली.असंच विचारले होते ह्या कडाडणाऱ्या वीजा का खेचल्या धरणीने.
माझ्या नजरेस नजर भिडवून, हळूच नजर चोरली तिने.अलगद चेहऱ्यावर घेतली काळ्याभोर केसांची बट.
रोजची संध्याकाळ अशी सावळी का हे विचारले तेव्हा.अन् आता बरसलय मोत्यांच हास्य माझ्यावर,
काव्यातला गोडवा तिने समजावला तेव्हा. -

“Throw Away” Culture
To gather knowledge by parking yourself within the four walls of your home is complete bliss. On one such heavenly weekend, while surfing on Facebook I came across a post about an aged couple. The scene went this way that, on the special eve of this couple a young chap from the audience wished to know the secret therapy behind the long bond of the couple. On which the old fella came with an answer which would sweep us off our feet. “Fortunately in our age broken things used to get repaired.” Was what he answered.
-

माँटुकले दिवस : छोट्या – मोठ्याची निखळ मैत्री
कित्येक वेळा म्हटलं जातं आयुष्य आनंदात जगायचं असेल तर आपल्यातलं लहान मुल कायम जाग ठेवावं. पण रोजच्या ऑफिसच्या कटकटी, कामाचे ताणताणाव, आजूबाजूला घडणाऱ्या, मनाला त्रासदायक अशा गोष्टी, या साऱ्या रामरगाड्यात ते बिचारं लहान मुल कुठे हरवून जातं कळतच नाही. पण आजूबाजूला कोणी छोटा दोस्त मिळाला तर? तर आयुष्यात किती बहार येईल हे फक्त “माँटुकले दिवस”च आपल्याला सांगू शकेल. पुस्तकाचं एकही पान न चाळता घेतलेलं हे पहिलच पुस्तक. हे नावच इतकं कमाल आहे की मला तर त्या पुस्तकाच्या शेल्फ पासून पुढे हालताच येईना. त्यात फिकट निळ्या, हिरव्या रंगत बनवलेलं सुंदर मुखपृष्ठ आणि संदेश कुलकर्णींनी लिहिलेलं आहे हे बघून तर ह्या खरेदीवर शिक्कामोर्तबच झालं.त्या तीन साडेतीन वर्षाच्या पिटुकल्या मेंदूत काय वेगानी नवनवीन कल्पना जन्माला येत असतात. त्यातूनच त्याचे नवनवीन खेळ तयार होतात. कधी चाळीच्या जिन्याचा रेल्वेचा डबा होतो, अचानक कुठलीशी खिडकी तयार होते. (more…)
-
प्रतिसाद की प्रतिक्रिया
माझ्या अमेरिकेत राहणाऱ्या एका चुलत बहिणीनी Humans of NewYork चा एक फोटो फेसबुकवर टाकला. फोटो तसा सामान्यच पण खरं लक्ष वेधलं ते त्या खाली लिहिलेल्या मजकुरानी. आजूबाजूला घडणाऱ्या कुठल्याही घटनेवर व्यक्त होणे हा मानवी स्वभाव आहे. मग ते देशाचे राजकारण असो की घरातला काही प्रश्न असो. तुमच्या कुटुंबियांशी झालेला वाद असो किंवा कामावर सहकाऱ्यांबरोबर निर्माण झालेले तणाव असोत. गल्लीतलं असो वा दिल्लीतलं, अरे चुकलच, गल्लीतलं असो की अमेरिकेतलं, आपलं व्यक्त होणं अगदी स्वाभाविक आहे. पण तुमच्या व्यक्त होण्याच्या पद्धतीवर त्याचा परिणाम अवलंबून असतो.
बऱ्याचदा घटना घडल्या-घडल्या आपसूकच आपल्याकडून बाहेर पडते ती प्रतिक्रिया. (more…)

