हा मार्ग शोधतो मी…

textgram_1515906162

कित्येक वर्ष सरली, तुज दूर जाऊनीही,
का आज आठवांशी, निशस्त्र भांडतो मी..

का मोजले मला तू, दुजा कुणी म्हणुनी,
हा विद्ध जाहलेला, तक्रार मांडतो मी..

तू दूर लोटले का, मज आपुले म्हणुनी,
कोडे कसे सुटावे, हा मार्ग शोधतो मी…

Continue Reading

आस

Heavy Rain
By Pridatko Oleksandr (Ukraine) [Public domain], via Wikimedia Commons
लागली ग आज पहा, धार पाऊस संतत,
तुला जमेना यायला, हीच मनी आहे खंत.

जर नाही तू सोबत, काय कामी हा एकांत
तुझ्या विना सखे माझे, नाही होत मन शांत,

संध्या उलटून जाते, मी एकाकी गर्तेत,
कशी काढावी कळेना, विरहाची सारी रात.

सैरभैर जीव झाला, वाटे कैद मी घरात,
तुझ्या भेटीचीच आस, फक्त आहे या मनात…


Transcript to roman script

Lāgalī ga āja pahā, dhāra pā'ūsa santata,
tulā jamēnā yāyalā, hīca manī āhē khanta.

Jara nāhī tū sōbata, kāya kāmī hā ēkānta
tujhyā vinā sakhē mājhē, nāhī hōta mana śānta,

sandhyā ulaṭūna jātē, mī ēkākī gartēta,
kaśī kāḍhāvī kaḷēnā, virahācī sārī rāta.

Sairabhaira jīva jhālā, vāṭē kaida mī gharāta,
tujhyā bhēṭīcīca āsa, phakta āhē yā manāta...

I am taking my Alexa Rank to the next level with #MyFriendAlexa and #BlogChatter

Continue Reading

एक आठवण…….

जपलेली असते खोल मनात,
तिनेच केली काळावर मात.

कधीतरी आतून बाहेर येते,
मनासमोर चित्र उमटते.

आसू आणि हसू ची असते साठवण,
अशीच असते ती एक आठवण.

Continue Reading