शब्द तुझे आठवून या नेत्रांपुढती चित्र नवे उमलले
शब्दांतल्या त्या गेयतेने सुंदरसे रंग भरले.
तू तुझ्या शब्दांसह ये चित्र माझे पूर्ण करण्या
चित्र माझे संगती घे सुंदरसे काव्य रचण्या.
शब्द तुझे चित्र माझे एकाची हे अंग झाले
आपल्या या जोडीने बघ विश्व सारे जिंकिले.
आज जुळली ही इथे अपुल्या मनाची स्पंदने
आज हे नवविश्व येथे निर्मिले या युतीने.
this is the awesomest yar