एकंच मन…

एकंच मन, विचारांच्या गर्दीत.
वा अडकलंय, एकांताच्या मिठीत.

घेतंय भराऱ्या, आभाळाच्या उंचीत.
कधी बांधून घेतं, स्वतःलाच बेडीत.

एकंच मन, असं सैरभैर फिरतं.
कदाचित हेच त्याचं, लक्षण असतं.

Leave a Reply

%d bloggers like this: