साजणा

बरसल्या मेघधारा,
ना सहे हा दुरावा,
मला जवळ घेना या क्षणा,
धुंद हा गार वारा,
का तुझा हा अबोला,
प्रीत ही का कळेना साजणा.

तुला पाहताना,
मनी दाटल्या ज्या,
समजून घे ना भावना,
नाही कळल्या तुला,
प्रीतीच्या या खुणा,
का असा दूर तू रे साजणा.

3 Comments

Leave a Reply