Adi's Journal

Pieces of my thourhgs

नातं: हळुवार फूललेल

प्रत्येक नातं कुठल्यातरी व्याख्येत बसवायचीच आपल्याला फार घाई असते बघा. कोणत्याही दोन व्यक्ती जर एकत्र आल्या तर त्यांना नात्यांच्या चिठ्ठया चिकटवण्यातच आपल्याला फार स्वारस्य असते. दोन व्यक्ति एकत्र आल्या, सुर जुळले आणि एकमेकांत प्रेमाचा ओलवा निर्माण झाला. बस् इतके साधे सोपे गणित त्या दोघांना का मांडू दिले जात नाही? कोणते न कोणते नात्याचे लेबल चिकटवायलच हवे का?

मुळात जर दोन व्यक्ति एकमेकांच्या ओठावरील हास्याचे आणि डोळ्यांतील अश्रुंचे कारण असू शकतील; एकमेकांवर असलेल्या प्रेमातल्या प्रामाणिकपणाची जाणीव ठेऊन जर नजरेला नजर देऊ शकत असतील तर काळ त्यांच्या नात्यावर आपली सत्ता गाजवु शकत नाही. मग तेव्हा न वय आड येते न भाषा. त्यासाठी त्यांना कोणत्याही ठळकपणे अधोरेखित केलेल्या नात्याची गरजच उरत नाही. त्यांच्यासाठी महत्वचे असते ते फक्त आपपसातील प्रेम, विश्वास आणि एकमेकांच्या सहवासात मिळणारे सुख. इतरांनाच त्यांच्या नात्याला अधोरेखित करायची खुमखुमि असते.कितीही निस्वार्थी वगैरे नातं आहे असं म्हटले तरीही नात्याची व्याख्या झाली रे झाली की त्याला अपेक्षांचे ओझे चिकटते. त्याला अपोआपच एक प्रकारच साचेबंदपण येतो.

का लोकांच्या इच्छेसाठी साऱ्याच नात्यांना प्रियकर प्रेयसी, नवरा बायको किंवा इतर कोणत्याही नात्यांमधे बांधायचे. त्याच दोन व्यक्ति कधी प्रेमात पडलेले यूगुल असतील तर कधी घनिष्ठ मित्र असू शकतात. कधी भावंडांचे बंध दिसतील तर कधी एकमेकांत आधरासाठी वडिल माणूस त्यांना सापडतील. त्यांच्या नात्याला असणारे हे अनेक पैलू त्यांना सापडण्या आगोदरच त्यांना कोणता तरी एकच पैलू कायमस्वरूपी चिकटवून टाकायचा? वास्तविक त्या दोन व्यक्तींमधे काय नाते आहे हे ठरवयचा अधिकार तुम्हा – आम्हाला नाहीचे.

केवळ आपल्या आजुबाजूच्या लोकांना आपल्या नात्यात अमुक एक पैलू दिसतो म्हणजे आपल्यात हेच एक नातं आहे अस पण कित्येक वेळा त्या दोघांचीही खात्री पटलेली नसताना मान्य केल जातं. त्याचं नातं पूर्ण फुलले नसतनाच ते गुलाब आहे की कमळ हे ठरवायची बघ्यांमधे जणू स्पर्धाच लागलेली असते. खरच अशा फुलांच्या जाती न पाडता फक्त मुकपणे त्याचं सौंदर्य लांबुन निरखलं तर त्या फुलांना पण फुलण्यात खूप मजा अनुभवता येईल.

Related Posts

4 thoughts on “नातं: हळुवार फूललेल

  1. So true! Labelling वृत्तीपायी कितीतरी नाती विस्कटणं सर्रास होत आलंय. कसला पुढारलेपणाचा आव आणून आपण जगतो हेच कळत नाही. साचेबद्ध विचार- साचेबद्ध जगणं-साचेबद्ध नाती! 🙁

  2. नात्यातील मोकळेपणा अजूनही स्वीकारला जात नाहीए हे खरंय..जिथे राधा व कृष्ण याचे नातं या संस्कृतीत स्वीकारलं जातं त्याच संस्कृतीत हे होतय हे दुर्दैव…

Leave a Reply