मौनाची कहाणी

माझ्या मनीचे ते गुज,
ओठी कधी आले नाही.
त्या मौनाचा तो अर्थ,
तुला कळलाच नाही.

सांगायचे होते खूप,
बोलायला शब्द नाही.
मौन ऐकायला कधी,
तुझ्यापाशी वेळ नाही.

अधुरीच आता राहे,
या मौनाची कहाणी.
वाट वेगळ्या धरल्या,
तुझ्या माझ्याही मनानी.

4 thoughts on “मौनाची कहाणी

Leave a Reply

%d bloggers like this: