Adi's Journal

Pieces of my thourhgs

जगन्नायका शक्ती दे तुची आता

जगन्नायका किती रे कष्टवितो
किती ही धीराची परीक्षा पाहतो
आता घाव हे सोसता सोसवेना
जगन्नायका शक्ती दे तुची आता
पहा हे कसे दैत्य उत्कार्शी गेले
सदा खाउनी सर्व संपन्न झाले
पुरा देश बाजरी विक्रीस आला
जगन्नायका शक्ती दे तुची आता
जगन्नायका लोकही अंध झाले
श्रुगालांवरी सर्वची सोपविले
निद्रिस्त शक्तीस जागे कराया
जगन्नायका शक्ती दे तुची आता.
गजेन्द्रसही सत्वर मोक्ष दिधला
आता तू कसा स्वस्थ निद्रिस्त झाला
जनांमाजी रे वन्ही तो चेतविण्या
जगन्नायका शक्ती दे तुची आता.

Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.

Related Posts

Leave a Reply