डोळ्यासमोर झाला गुंता सोडवण्या मी बसले
कळालेच ना कुठे कधी कशात काय गुंतले.
लक्ष गोष्टी त्या एका वेळी अशा कशा सुरु झाल्या
गुंताण्यासाठीच जणू की इथे त्या एकत्र आल्या
काही केल्या उमजत नव्हते काय आधी उकलावे
एक गाठ सोडवताना दुसरीने अधिकच गुंतावे.
हळूच अचानक एखादी ती गाठ मोकळी व्हावी
गुंता सुटण्याची मग चिंन्हे लख्खपणे उजळावी.