सुट्टी म्हटलं की सगळ्यांना आठवत ती शाळेतली सुट्टी, मग ती मे महिन्याची उन्हाळी सुट्टी असो किंवा दिवाळीअसो. अर्थात दोन्ही सुट्ट्या तशा वेगळ्याच. दोन्हींचे आनंद वेगळे, दोन्हीत करायची धमाल वेगळी. उन्हाळी सुट्टी मित्रांबरोबर आईच्या ओरद्ण्याला न भीक घालता भर उन्हात धुडगुस घालायची तर दिवाळीची सुट्टी मामाच्या घरी, माविकडून किंवा आजी आजोबांकडून लाड करून घेण्यात घालवायची. पण शाळा संपली तशी ही हक्काची सुट्टी पण कुठे गुडूप झाली देव जाणे.
वाटलं होतं, कॉलेजला गेलो की सगळेच दिवस तसे सुट्टीचेच असतील पण कसले काय. (more…)