Adi's Journal

Pieces of my thourhgs

थोडे आत डोकवा

काल सहज म्हणून रात्री पूर्वी दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या चंद्रशेखर द्विवेदींच्या ‘चाणक्य’चे काही भाग बघत होतो. अचानक आर्य चाणक्याच्या तोंडी असलेला एक उतारा सध्याच्या परिस्थितीला इतका चपखल बसणारा वाटला. सगळ्याच समाजांतून परस्परांविरुद्ध गरळ ओकायचे काम चालू आहे. आपले सन्माननीय संसद-सदस्य देखील स्वतःचे दायित्व सोडून धर्म, पंथ द्वेषाची विधाने आणि आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. तथाकथित धर्मगुरू आणि धार्मिक नेते आपणच काय ते श्रेष्ठ आणि बाकी सारे कसे मूर्ख आहेत हे सांगण्यात मग्न आहेत. सगळीकडेच कट्टरतेचे विष पसरते आहे. समाजमनात खोलवर भिनत जात आहे.

या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्य चाणक्याचे ते शब्द बाणासारखे थेट मनापर्यंत पोचतात आणि डोळ्यात झणझणीत अंजन घालतात. अर्थात हे अंजन पण ज्यांनी डोळे उघडायचे ठरवले आहे त्यांच्याच डोळ्यात जाईल म्हणा. पण मला ते तुमच्यापर्यंत पोहोचावाल्याशिवाय आज राहवत नाहीये. आज सर्वांनाच खरोखर गरज आहे ती आत्मपरीक्षणाची, स्वतःच्या श्रद्धांना ठोकून-ठाकून पडताळून घेण्याची, काही परिवर्तन घडवण्याची. आणि नक्कीच या साऱ्याची सुरुवात आणि शेवट हा फक्त वैयक्तिक असणार आहे. कोणताही धर्मगुरू, अथवा धर्मपरिषद हे परिवर्तन घडवू शकत नाही. प्रत्येकानी आपापल्या मनाशी सदसद्विवेकबुद्धीच्या कसोटीवर श्रद्धा, परंपरा घासून घ्यायला हव्यात मग तो कोणत्याही धर्माचा असो, कुठलाही व्यवसाय अथवा नोकरी करणारा असो, समाजात त्याचं कोणतही स्थान असो. पण आज वैयक्तिक कसोटीच्या दगडावर हे सोनं घासून घेतलं नाही तर हे विद्वेषाचे बीज फोफावायला वेळ लागणार नाही.

माझी प्रस्तावना पुरे करतो आणि तुम्हाला आर्य चाणक्याच्या तोंडचे ते संवाद वाचायला देतो ज्यांनीं मला हा सारा विचार करायला भाग पाडलं. तुम्हीही यावर काही विचार कराल याची मला खात्री वाटते. वाटले तर तुमचे विचार इथे अभिप्रायांच्या रूपाने जरूर मांडा किंवा स्वतःपुरते ठेवा. पण यावर नक्की विचार करा.

आर्य चाणक्य :

“तुम्हारे पतनका कारण तुम स्वयं हो; हमारे पतनका कारण हम स्वयं है| कोईभी मूल्य एवं संस्कृती तबतक जीवित नाही रेह सकती जबतक वह आचरण मे हो| झूठ केहेते है वे लोग जो दुसरे साम्प्रदायोंके उदयको अपने पतनका कारण मानते है| आस्थाए तुम्हारी थी, वह डिग कैसे सकती है| और यदी तुम्हारी आस्थाको सत्यका आधार नही है तो उसका पतन होना चाहिये| तुम्हारा मार्ग भिन्न हो सकता है| उसका मार्ग भिन्न हो सकता है| सत्य तक पहुचनेके मार्ग भिन्न भिन्न हो सकते है| इसलिये जो अपने मार्गपर अपने साथ नाही उसका मार्ग गलत है यह मानना गलत होगा| ‘एकम् सत्यम् विप्रा बहुदा वदन्ति||’ एकही सत्यको विद्वान अलग अलग रुपोमे व्यक्त करते है| सांप्रदाय मार्ग हो सकते है लक्ष नाही| साधक और साध्यके बीच साधना है| साधना तो एक मार्ग है| वहभी भिन्न हो सकता है| एकही संस्कृती के अनुयायीओंकी साधनाए भिन्न हो सकती है| अतः साधनाओकी भिन्नतासे, सम्प्रदायोन्की भिन्नतासे हमारी संस्कृतीमे भेद नही हो सकता| संस्कृती तो सत्यनिष्ठ जीवनमूल्य है| जीवनकी एक पद्धती है जिसके हम सभी अनुयायी है| “जीवनमे हमारी आस्था है” यह हमारी संस्कृती है| यह हमारा संस्कार है| जो सत्य से परान्मुख हो वह हमे स्वीकार नही| यह हमारी पद्धती है| यह हमारा अनुशासन है| और यही संस्कृती हमे भिन्न भिन्न उपासनाके मार्ग देती है| जीवनकी एक पद्धती और उपसानाकी दुसरी पध्दती मे कोई संघर्ष नही है जब तक वह सत्यनिष्ठ है| इसलिये दुसरोंका मार्ग तुम्हारे मार्ग से भिन्न हो तो चिंता मत करो, विचलित मत हो| अपनी आस्था को संजोगकर रखो, मुल्योंको जतन करो और समय समयपर उनका मुल्यांकन करो| सत्य के प्रकाश मे अपनी परम्पाराओंको देखो और उनका विश्लेषण करो| जबतक तुम सत्यकी रक्षा करोगे संस्कृती तुम्हारी रक्षा करेगी, यह तो सिधी समझमे आनेवाली बात है| यदि आज तुम असुरक्षित मेहसूस कर रहे हो तो कारण बाहर नही भीतर है| सत्य का मार्ग तुम छोडते हो तो चुनावके लिये कौनसा मार्ग शेष रेह जाता है? यही तुम्हारे पतन का कारण है| और यही समाजके पतनकाभी कारण है| चुनौती स्वीकार करनेकी बजाह आप द्वेष करते है, घृणा करते है| दुसरोंको चुनौती देते है| यदि सत्यनिष्ठ मुल्योमे तुम्हारी इतनीही आस्था है तो उन्हे जी कर दिखाओ| तुम्हारा कर्तृत्वही तुम्हारा इतिहास हो सकता है| और अपना इतिहास बनानेका तुम्हे अधिकार है| सामर्थ्य है तो उठकर दिखाओ, जीकर दिखाओ, करकर दिखाओ, उदाहरण रखो, उदाहरण बनो, किसने तुम्हे रोक रखा है? बढो आगे बढो|”

Related Posts

One thought on “थोडे आत डोकवा

  1. Truly said by Chanakya.. Thanks for sharing such valuable thoughts. Ani kharach aagdi chapkhal bastait he sagle vichar itkya varshannihi

Leave a Reply