Category: कविता

  • दुरावा

    हा दुरावा का असतो प्रत्येक प्रेमात?

    पण एक न्याराच सुख असतं त्यात.

    प्रेमात बऱ्याचदा हाच सोबत असतो,

    दोघांना बेटा सदा वेडावत असतो.

    वाकोल्या बघून दोघं जाम चिडतात,

    पण राग  कुठेतरी लांब भिरकावतात.

    ती त्याला आणि तो तिला;

    कल्पून दुराव्यालाच कुरवाळतात.

  • मनाचं कोडं

    न सुटणार गहन कोडं

    असतं आपलं मन.
    खरच कुणी सांगेल का
    काय असतं मन?
    विचारांचं दळण दळणार
    जातं म्हणजे मन?
    की गहिऱ्या डोहासारखं
    शांत निश्चल मन?
    हळुवार नाजूक गुलाब जणू
    भुरळ पाडत मन?
    की त्याच्याच काट्यासारखं
    टोकदार असतं मन?
    वादळी पावसासारखा
    झोडपत ते मन?
    की मृद्गंध देणारी
    पहिली सर असतं मन?
    खरंच डोकं फुटलं तरी
    उमजत नाही हे मन.
    सांगेल कुणी समजावून
    काय असतं मन?
  • यादे

    जब कोई निकल पडे उस मकाम कि ओर;

    जहांसे नाही कोई राह वापसी कि ओर.
    छोड जाता है पीचे सिर्फ दो चीजे;
    आंखो मी आसू और दिल में यांदे
    ये आंसू भी बडे गद्दार होते है;
    बस चंद दिनोंके मेहमान होते है.
    लेकीन यांदे होती है बडी वफादार;
    बार बार आकर बनाती दिलको शिकार.
    फिर दिल भी होकर यादोंका गुलाम;
    घुमने जाता है बीछडे रस्तोंके मकाम.
    भेजता है फिर उनही आसुओन्को पैगाम;
    आनाही होगा तुम्हे यादोंकी बाहे थाम.
  • लब्बाड ढगा

    का रे लब्बाड ढगा,

    असं का तू करतोस?
    उन्हात काळवांडलास
    म्हणून का रे लपतोस??
    असं किती लपशील
    पटक्कन ये ना..
    तुझ्याकडच गोड गोड पाणी,
    मला तू दे ना.
    ए… उगी नाटक केलास ना
    तर डोंगर दादाला सांगीन.
    दूर दूर पळताना तुला
    रंगे हाथो पकडीन.
    त्यांनी एकदा पकडलं
    कि मग काय करशील?
    इतका वेळ लपवलेलं
    एका मिनिटात देशील