कशी कळावी सखे तुजला
मौनाची ही भाषा,
माझ्या मनी उगीच दाटे
अनामिक वेडी आशा.
Category: कविता
-
वेडी आशा
-
रुकीसी जान…
दिलसे निकली ये जो बात
होठोमे दबी रही.
वो जो आए इस कदर
के ये जान रुकी रही.उन झुल्फोके बिखर्ते
घटा काली छा गई
उनके होठोकी लालीपे
ये सांस रुकी रही.न निकले लब्ज लबोंसे
चेहेरे पे सिर्फ हसी रही.
उनसे मुहब्बत हमारी
हम ही तक रुकी रही.. -
सये डोळ्यांमध्ये तुझ्या,
खोल गहिरा गं भाव,
खोल डोहात त्यांच्या,
वाटे बुडून राहावं. -
मनाची सफर
एका शांतशा संध्येला, मन मनात म्हणालं,
दूर क्षितिजाच्या पार, जरा सफारीला जावं. -
अथांग मन
मन पाखरू पाखरू,
फिरतसे सैरभैर.
कधी इथे कधी तिथे,
न ठरे कुठे स्थिर.मन विशाल आकाश,
एक अथांग पोकळी.
कधी दाटतात मेघ,
फोडतात डरकाळी.मन सागर तो खोल,
नाही दिसे कुठे तळ.
एक निळाई गंभीर,
तिला नाही कुठे खळ.कसे न्यारे आहे रूप,
अशा अथांग मनाचे.
इंद्रधनू हे सजले,
जणू विविध रंगांचे.

