Category: कविता

  • तुमचं मत फक्त मला

    ओळखलत का काका मला थाटात आला कोणी,
    डोक्यावरती गांधी टोपी अंगावरती खादी.

    क्षणभर हसला नंतर बसला, बोलला वरती पाहून,
    आपलंच घर आहे म्हणून बोलतो जरा बसून.

    आलं मनात यावे एकदा दिल्लीवारी करून,
    म्हणूनच बघतोय काका मी इलेक्शन ही लढवून.

    कामं तुमची सांगा फक्त करून टाकू फटाफट,
    मतं फक्त जरा तुमची पडू द्या टपाटप.

    इलेक्शन नंतरच्या कामांचा देतो खास आश्वासन,
    मला निवडून दिलात तर येणार नाही फ्रस्ट्रेशन.

    शेक ह्यांड साठी हात देत हसत हसत बोलला,
    लक्षात असू द्या काका तुमचं मत फक्त मला.

  • मैत्री आणि प्रेम

    एखादी व्यक्ती नेहमीच भेटाविशी वाटते
    ती मात्र दर वेळी वाट पाहायला लावते.

    प्रेमात हे असंच चालत राहत
    सगळीकडे असं सेम सेम असतं.

    मध्यान रातीला आवाज दे, होईन हजर
    सुखातच नाही, तर दुःखातही असेन जवळ.

    येणार नाही आपल्यात कधीही दुरावा
    हाच तर आपल्या या मैत्रीतला ओलावा.

    मैत्रीचं नातं अगदी अतूट असतं
    प्रेम मात्र आपला उगीच भाव खात.

    तसं म्हणाल तर मैत्रीत काय वेगळं असतं.
    दोन मित्रांमधला प्रेमच तर बहरतं.

  • रंग

    कधी वाटते मनाला दूर डोंगरी चढावे
    मोठ्या साऱ्यांनाच छोटे वरून बघावे..

    कधी वाटे जावे खोल खोल त्या सागरी,
    त्या चपळ माश्यांची यावी घेऊन उभारी.

    उंच उडावे आकाशी पंख लावून स्वप्नांचे
    खाली आणावे खेचून रंग इंद्राच्या धनुचे.

  • जगन्नायका शक्ती दे तुची आता

    जगन्नायका किती रे कष्टवितो
    किती ही धीराची परीक्षा पाहतो
    आता घाव हे सोसता सोसवेना
    जगन्नायका शक्ती दे तुची आता
     
    पहा हे कसे दैत्य उत्कार्शी गेले
    सदा खाउनी सर्व संपन्न झाले
    पुरा देश बाजरी विक्रीस आला
    जगन्नायका शक्ती दे तुची आता
     
    जगन्नायका लोकही अंध झाले
    श्रुगालांवरी सर्वची सोपविले
    निद्रिस्त शक्तीस जागे कराया
    जगन्नायका शक्ती दे तुची आता.
     
    गजेन्द्रसही सत्वर मोक्ष दिधला
    आता तू कसा स्वस्थ निद्रिस्त झाला
    जनांमाजी रे वन्ही तो चेतविण्या
    जगन्नायका शक्ती दे तुची आता.
  • लगन

    है अगर दिलमे कोई लगन अपने,
    उठ खड़ा हो, कर पुरे सारे सपने.
    हो हिम्मत अगर जिगरमे तेरी,
    भर तू ताकत अपने पंखोमे पूरी.
    नहीं चलना है तुम्हे इस जमींपे
    लेहेराना है परचम अपना गगनपे…

  • वेडी आशा

    कशी कळावी सखे तुजला
    मौनाची ही भाषा,
    माझ्या मनी उगीच दाटे
    अनामिक वेडी आशा.