अनेक अनेक आठवांच्या सावल्या
मनाच्या कोपऱ्यात हळुवार जपल्या
अंमळ हळव्या किंचित रडव्या
बऱ्याच हसऱ्या काही खोल गहिऱ्या
वर येतात अचानक जणू श्वास घ्यायला
डोळ्याच्या कडा हळूच ओल्या करायला.
Category: कविता
- 
		
		सावल्या
- 
		
		पुतळ्यांचे आंदोलनचौकाचौकातले पुतळे एकदा, रामलीलेवर जमले.मागण्यांसाठी त्यांच्या त्यांनी, आंदोलन छेडले.म्हटले सारे एकमुखांनी, पुरे हा अत्याचार.एक दिसाच्या कौतुकाचा, थांबवा भडीमार.त्यादिवशीच्या हार तुऱ्यांनी, झालोत बेजार.आमच्या जन्म मृत्यूचा, मांडला की बाजार.आदल्या दिवशी सफाईची, ये तुम्हालाच उर्मी.पाण्याच्या त्या माऱ्यानी तुम्ही, घालवता गर्मी.अंगावरती बागडती हो नानाविध पक्षी.सोबत होती जरी करिती ते विष्ठेची नक्षी.दोन क्षणांच्या अंघोळीने सफाई तर झाली,स्नेह्यांपासून दुरावण्याची शिक्षाही झाली.दुसऱ्या दिवशीच्या भाषणांनी तुमची मते भरलीआमच्या नशिबी मात्र पुन्हा एकाकी रात्र आली
- 
		
		पलहम बैठे है मश्घुल 
 आने पलोके ख्वाब मे,
 भूल जाते है हम के
 कोई एक पल हातसे छूटा है
- 
		
		जहांकी रीतइस जहांकी रीत कितनी बेगानी 
 मगर है तो ये बहोतही पुरानी
 कूच बोलू तो सब कहे चूप हो जा,
 खामोश को पुछे उसकी कहानी …
- 
		
		क्यू खो गये होक्यू खो गये हो तुम अपनेही खयालोमे, तुम ना रहो गुमसुम इस हसीन शाममे ।। देखो सारी वादी धुंदला रही है, असमापर ये घटा छा रही है, मेहकती हवा भी अब चल रही है, क्यू न भरलो तुम इसे सांसमे ।। ये पंछीभी गुनगुना रहे है, शाखोंपे पत्ते डोलने लगे है, सारी दुनिया मे एक ताल है, चल मिलाए कदम उसी तालमे।। 
- 
		
		गुंताडोळ्यासमोर झाला गुंता सोडवण्या मी बसले 
 कळालेच ना कुठे कधी कशात काय गुंतले.लक्ष गोष्टी त्या एका वेळी अशा कशा सुरु झाल्या 
 गुंताण्यासाठीच जणू की इथे त्या एकत्र आल्याकाही केल्या उमजत नव्हते काय आधी उकलावे 
 एक गाठ सोडवताना दुसरीने अधिकच गुंतावे.हळूच अचानक एखादी ती गाठ मोकळी व्हावी 
 गुंता सुटण्याची मग चिंन्हे लख्खपणे उजळावी.

