Category: कविता

  • झड

    झड

     

    बघ वाढली बाहेर
    आज पावसाची झड,
    तुझ्या आठवांनी सये
    मन झाले माझे जड.

    आठवांनी त्या क्षणांच्या
    वेचले जे तुझ्यासवे
    दोन विहिरी डोळ्यांच्या
    बघ भरती आसवे.

    आला विचार हा मनी
    पण सवाल हा पडे,
    पावसाच्या काळ्या मेघा
    धाडावे का तुझ्याकडे?

    निश्चयाची खूण मग
    माझ्या मनाशी बांधून,
    धाडतो त्या मेघाला मी,
    हाच निरोप घेऊन…..

     

    Image Credit : Omkar Paranjpe

  • राज़

    इन आँखोसे कहो न कुछ बयाँ करे,
    जो छुपाया है दिलमे वो हसींन राज़ है।

    जिस शिद्दत से दिलने संभाला है उसे,
    ये होंठ क्यों बयाँ करनेपे अड़े है।

    न बनाओ उन्हें इस राज़का हमराज़,
    उन्हींसे तो हमने ये राज़ छुपाया है।

  • डाव बुद्धिबळाचा

    डाव बुद्धिबळाचा

    बघितला तुझा व्यूह, निरखून दिशा दाही.

    पटावरच्या काळ्या घरी तू सूर्य घातलास,

    याचे सारे मोहोरे मारले, मनाशीच म्हटलास.

    पटदिशी दिवा लावून, माझ्यापुरता उजेड केला

    पायाखालचा रस्ता माझ्या, उजळून सोपा केला.

    लगेच हाती प्रलय घेऊन, केलीस पुढची खेळी,

    मनूच्या नावेत बसून निसटला बघ तुझा बळी.

    तुच्छ कटाक्ष टाकलास, कालचक्र माझ्यावर सोडून,

    काळालाच मोडूनतोडून मी क्षण क्षण घेतला जागून.

    माझा आत्मविश्वास मारू पाहिलास काही चमत्कारांनी,

    पण तुझा वजीरच खाल्ला माझ्या एका प्याद्यानी.

    मृत्यूचा शह देऊन तुला वाटलं, आता सारं जिंकलं,

    देह नेतोस तर ने म्हणत मी आत्म्याला वाचवलं.

    तू आता चाचप व्यूह, निरखून दिशा दाही.

  • पावसाळ्याचे स्वागत

    Welcoming monsoon with words is always feel good thing… for this monsoon these lines come to my mind,

    तप्त झाल्या या पृथेला, ओढ होती काळीमेची,
    काहिली झाली जगाची, आस लागे पावसाची,
    त्रासलेले जीव सारे, तत्क्षणी आनंदले,
    ज्या क्षणी क्षितीजावरी ते, कृष्णमेघ दाटले…..

  • कळणार नाही

    वेदनेची तीव्रता तुजला कधी कळणार नाही,
    वार जे वर्मी दिले ते घावही दिसणार नाही….

    खोल रुतल्या या शरांची, तुजला कधी नव्हती तमा, (more…)

  • झुळुक

    सायंकाळी आली दुरुनी,
    झुळुक हवेची मखमाली,
    केसांमधुनी वाट काढता,
    शब्द काहीसे गुणगुणली.

    दूर राहते तुझ्याहून जरी.
    आठवणी त्या मज छळती.
    रात्रंदिन मी वाट पाहते,
    तुझ्या वाटेला विचार की.

    न राहोनी आज या क्षणी
    सांगितले या वाऱ्याला,
    घेऊन जा तू हा सांगावा,
    ये भेटाया सख्या मला.

    इतुके बोलून झुळुक हवेची,
    क्षण एकच तो घुटमळली,
    निमिष संपता मागे फिरुनी
    उत्तर माझे घेऊन गेली.