Author: Adi Sathe

  • Stories from the 40s

    Stories from the 40s

    Some books indeed get published with that one quality which stops you putting that book down once you turned its first page. Some days back I came across one such book in Marathi. Title of the book was fascinating in itself. ” फुले आणि दगड” speaks loudly contradictions in qualities possessed by people around us. This is a collection of stories written by वि. स. खांडेकर, V. S. Khandekar who is reknowned for his remarkable novel ययाती  based on story of Yayati Devayani from Indian Mythology.

    But here in this book he takes us on the journey of Maharashtrian village life in the decade of 1940s. (more…)

  • Composer who can cook, write, and do many more

    Composer who can cook, write, and do many more

    Its been long time for all of us to know Shantanu Moitra as renowned music composer, in Bollywood and his other non-Bollywood projects like Abke Saawan, Coke Studio, Dewarists but if you really want to get look at all the shades and colours of this multi-faceted humble human being, just go and grab your copy of his memoirs “On the wings of music”.

    As we expect, memories about music is the main content of the book but the narration of those memories enlightens the shades of (more…)

  • झुळुक

    सायंकाळी आली दुरुनी,
    झुळुक हवेची मखमाली,
    केसांमधुनी वाट काढता,
    शब्द काहीसे गुणगुणली.

    दूर राहते तुझ्याहून जरी.
    आठवणी त्या मज छळती.
    रात्रंदिन मी वाट पाहते,
    तुझ्या वाटेला विचार की.

    न राहोनी आज या क्षणी
    सांगितले या वाऱ्याला,
    घेऊन जा तू हा सांगावा,
    ये भेटाया सख्या मला.

    इतुके बोलून झुळुक हवेची,
    क्षण एकच तो घुटमळली,
    निमिष संपता मागे फिरुनी
    उत्तर माझे घेऊन गेली.

  • मिलन

    शुभ्र उन्हाचे तुजला कोंदण,
    रात्र काजळी माझे मी पण,
    तिन्हीसांजेच्या भगव्या रंगी,
    तुझे नी माझे झाले मिलन….

  • थोडे आत डोकवा

    काल सहज म्हणून रात्री पूर्वी दूरदर्शन वर प्रसारित होणाऱ्या चंद्रशेखर द्विवेदींच्या ‘चाणक्य’चे काही भाग बघत होतो. अचानक आर्य चाणक्याच्या तोंडी असलेला एक उतारा सध्याच्या परिस्थितीला इतका चपखल बसणारा वाटला. सगळ्याच समाजांतून परस्परांविरुद्ध गरळ ओकायचे काम चालू आहे. आपले सन्माननीय संसद-सदस्य देखील स्वतःचे दायित्व सोडून धर्म, पंथ द्वेषाची विधाने आणि आरोप प्रत्यारोप करण्यात धन्यता मानत आहेत. तथाकथित धर्मगुरू आणि धार्मिक नेते आपणच काय ते श्रेष्ठ आणि बाकी सारे कसे मूर्ख आहेत हे सांगण्यात मग्न आहेत. सगळीकडेच कट्टरतेचे विष पसरते आहे. समाजमनात खोलवर भिनत जात आहे.

    या साऱ्या पार्श्वभूमीवर आर्य चाणक्याचे ते शब्द बाणासारखे थेट मनापर्यंत पोचतात आणि डोळ्यात झणझणीत (more…)

  • तव आठवणींच्या संगे, कित्येक रात्री सरल्या.
    तव विरहाने हृदयावर, बघ कट्यारी चालल्या ||
    तुझी संकेताची खुण, मनोमानी ती पटली,
    त्याक्षणी रे मनात, लक्ष कळ्या उमलल्या ||
    बाहुपाशात तुझ्या रे, जेव्हा मी सामावले,
    साऱ्या रोमारोमातून, विद्युलता चमकल्या ||