कधीकधी आठवण येते त्या बंदीशींची,
त्या सुरांची ज्यात माझं मन पार बुडून गेलेलं असायचं,
त्याच्या डोळ्यातली चमक वाटायची एखादी सळसळत गेलेली तान तर त्या पापण्यांची उगाच होणारी फडफड ऐकवायची एखादी लकेर.
त्याच्या कटाक्षात भासायचे मालकंसाचे आरोह अवरोह
त्याच्या नुसत्या अस्तित्वानेच माझ्या मनात संगीत भरून जात असे.
अन् माझ्या हृदयाची धडधड त्याच्या हृदयाच्या धडधडीच्या तालाशी जुळवून घेई. त्या नाजूक क्षणात सुद्धा ऐकू येई एखादी बनारसी ठुमरी जेव्हा आमची शरीरे बोलत होती.
इतकंच कशाला त्याच्या निःशब्दतेत सुद्धा एक अनाहत नाद घुमत होता.
या संगीताने माझ्यातली पोकळी भरून काढली आणि आमच्यातील द्वैत संपवलं. मेंदूतील कंपनांनी या सुरांशी जुळवून घेतलं आणि कानात हे सूर अखंड वाजत राहिले. त्याच्या संगीताची इतकी धुंदी होती की जणू त्या सुरांच्या बेड्याच पायी पडल्या.
पण, पण या मैफिलीत सुरसंगत माझी होती, त्याच्या मागे बसून त्या सुरवटींचा पाठलाग करणं हेच जणू माझं प्राक्तन होतं. त्याच्या दुर्गम अशा लायकारीला शरण जाणं भागच होतं म्हणा.
त्यानी उभ्या केलेल्या या ख्यालविश्वात माझे मंद्र आणि तयार सूर सुद्धा जागच्या जागी चपखल बसले होते, कारण, कारण हे विश्व आमचं होतं. ते सूर “आम्ही” होतो…
~~~
मूळ इंग्रजी मुक्तछंद
– आरुषी सिंघ
आजूबाजूला घड्याळाच्या काट्यावर चालणारी मानवी यंत्रे घेऊन,
शहराच्या दाट लोकवस्तीतल्या एका उंच इमारतीत राहतो तो.
दिवसभर चालणारे दावे, आकडेमोडी आणि देवाणघेवाण बघत,
आपल्या मनाला यांचा संसर्ग होऊ नये यासाठी निग्रहाच्या भिंती बांधतो तो.
सकाळी पहिल्या चहाबरोबर भोवतालच्या व्यवहारी रुक्षपणाला जाग येते,
आणि त्याला हद्दीबाहेर ठेवण्यासाठी त्याच्या बुरजातली जागा पकडतो तो.
टाइपिंगचा खडखडाट, फोन आणि मोबाईल च्या घणघणाटा पासून लांब जात,
त्याच्या मनातल्या वाद्यवृंदाच्या मंजुळ सुरावटींचा आवाज ऐकतो तो.
हे भयाण वाळवंट भोवतालच्या कोटाच्या बाहेर ठेवण्याचा लढा दिवसभर सुरूच असतो,
संध्याकाळ होते, खडखडाट, घणघणाट, देवाणघेवाण, हेवेदावे, आकडेमोड, शांत होते, आणि मगच बुरुजावरून उतरतो तो.
तिन्हीसांजेपासून पुन्हा सकाळ होईस्तोवरची अखंड रात्र त्याची असते, एकाकी,
पण बाजूच्या कुंपणावरच्या एकट्याच असणाऱ्या पारिजातकासारखा बहरतो तो.
He lives in a highrise in a crowded part of the city, surrounded by human machines running on the clock. He has built a fortress around him to keep out the contamination of quarrels, under the table transactions and calculations which he witnesses daily. This all starts with the first cup of tea of the day and he takes his place on the battlement of the fortress. He enjoys the symphony in his mind played only for him by his mind-orchestra and ignores keystrokes of typing, a ringing of mobile and landlines. As the dusk approaches, all the cluttering keystrokes, ringings, transactions, quarrels and calculations fade out and finally, he gets down from the battlement. From dusk till next morning, entire night is his, his alone. Lonely, yet he blooms just like a lonely “Parijatak” standing on the fence.
I am taking my Alexa Rank to the next level with #MyFriendAlexa. My current ranking is 3,130,542. I am trying to improve on this. Hope you all enjoy my Marathi poems. You can find my other posts in this campaign here. I would like to thank Blogchatter for the support you guys extend to us.
बांधू कंकण मोतीये,
मन खुलेलं क्षणात.
वाटे आकाश चांदणे,
मी बांधले हातात.
या बांगड्या लाखेच्या,
मज घेऊ वाटतात,
फुलतील इंद्रज्योती,
तिच्या साऱ्या आरश्यांत.
काय काय भरू हाती
नाही ठरत मनात,
का होते माझे ऐसे,
दरवेळी श्रावणात?
Thank you Anupriya for such a wonderful suggestion of posting audio of my recitation, and see fortunately Saad Ahmed from “बैठक and beyond” has captured this recitation from our yesterday’s session at “Matoshree Ramabai Ambedkar Udyan, Pune” where I have explained a bit about the poem in Hindi too. Thank you, Saad.
I am taking my Alexa Rank to the next level with #MyFriendAlexa and #BlogChatter