Category: कविता

  • पुन्हा एकदा…

    textgram_1535783288


    पुन्हा आपली भेट व्हावी जराशी,
    मनी भावना तीच यावी जराशी…

    पुन्हा एकदा मीच हारून पैजा,
    मनी कोवळी ठेच खावी जराशी…

    पुन्हा मागुनी एक द्याविस हाक
    मनाची गती तेज व्हावी जराशी…

    पुन्हा भोवती तो फुलावा बगीचा
    मनाला बीन ऐकू यावी जराशी..

    पुन्हा तू नि मी तेच सारे जगावे,
    गळुनी जुनी वर्ष जावी जराशी…


    Phonetic in Roman script

    Punhā āpalī bhēṭa vhāvī jarāśī
    manī bhāvanā tīcha yāvī jarāśī...
    
    Punhā ēkadā mīcha hārūna paijā,
    manī kōvaḷī ṭhēcha khāvī jarāśī...
    
    Punhā māgunī ēka dyāvisa hāka
    manāchī gatī tēja vhāvī jarāśī...
    
    Punhā bhōvatī tō phulāvā bagīchā
    manālā bīna aikū yāvī jarāśī.. 
    
    Punhā tū ni mī tēcha sārē jagāvē,
    gaḷunī junī varṣa jāvī jarāśī...

    Poem recited by Aditya Sathe


    Rough English Translation (non-poetic)

    I wish, we could meet again, just for a while, and feel the same feelings in our hearts.

    I want to lose the challenges and stumble and bear that sweet pain.

    will you call me back again when I am about to leave? I want to feel my heart racing again.

    I wish that blossom will bloom again surrounding us, and I’ll listen to those fiddle tunes again.

    Let’s live those times again, You and I. Let the time lapse, again…


    I am taking my Alexa Rank to the next level with #MyFriendAlexa. My current ranking is 4,815,106. I am trying to Hope to improve on this. Hope you all enjoy my Marathi poems.

    AJ alexa rank 010918
    Alexa Rank of Adi’s Journal on Sept. 1st, 2018
  • मी रमलो…

    मी रमलो…

    textgram_1526036840

    तू जवळी नसता सखये, आठवांमध्ये मी रमलो,
    मी उघड्या नयनांनेही, स्वप्नांच्या नगरी रमलो

    मौनाच्या बुरख्यामागे, माजले मनीं काहूर
    हातात हात तू घेता, आश्वासक स्पर्शी रमलो

    संध्येस भरे मधूशाला, मद्याची चढली झिंग
    तव मिठीगंधाने चढल्या, कैफात सखे मी रमलो

    लागली आस मज आता, यापरी काही ना उमजे
    वाटते हर पळ पुढचा, सोबती तुझ्या मी रमलो

  • तुज विचारायचे होते…

    का आठव येतो आज, मन भावुक माझे होते,
    तव नाजूक गंधकुपिला, भूतात दडवले होते,

    का आज माझिया मनीचे, अस्वस्थ पाखरू होते,
    जणू पुनःपुन्हा भटकून, काहीसे शोधत होते,

    का कळले नाही मजला, तुजपाशी उत्तर होते,
    ओठांत अडकले माझ्या, जे विचारायचे होते,

    जर पुन्हा झाली भेट, तुज विचारायचे होते
    का आज मनाने तुही, तहानला चातक होते…

  • महासागराशी…

    media-20180113

     

    महासागराच्या फेसाळत्या किनारी,
    तुझे पाय आले, निरव सांजवेळी,

    खळाळून लाटा किनाऱ्यास येती ,
    करा पाय ओले, तुजला खुणवती,

    अनामिक का एक शंका वसावी,
    भीती कोण एक मनाच्या तळाशी,

    अचानक कधी एक उर्मी उठावी,
    पायीचे जोड मागे उरावे किनारी,

    क्षणी शांत व्हावी, दुविधा मनाची,
    जुळे घट्ट मैत्री, महासागराशी

  • हा मार्ग शोधतो मी…

    textgram_1515906162

    कित्येक वर्ष सरली, तुज दूर जाऊनीही,
    का आज आठवांशी, निशस्त्र भांडतो मी..

    का मोजले मला तू, दुजा कुणी म्हणुनी,
    हा विद्ध जाहलेला, तक्रार मांडतो मी..

    तू दूर लोटले का, मज आपुले म्हणुनी,
    कोडे कसे सुटावे, हा मार्ग शोधतो मी…

  • डावास नांव इश्क

    WhatsApp Image 2017-10-23 at 10.08.00 AM.jpeg

     

    डावास नांव इश्क, जो रंगात येत आहे,
    जीवास माझिया मी, दाव्यास लावताहे.

    ही खातरी मलाही, हरणार मीच आहे,
    रुपास त्या भुलूनी, फासे फितूर आहे,

    नजरेसमोर अजुनी, थोडे तिने असावे,
    म्हणून खेळतो मी, जरी हारलोच आहे.