माणूस कायमच होता, खूप पाणी या भ्रमात,
उडाली झोप त्याची, जेव्हा सगळी धरणं गेली तळात.
काय करावा उपाय म्हणून बसला लावून कपाळी हात,
शेवटी झाला नाईलाज तेवा केली जाहीर पाणीकपात.
झाली पळापळ ऐकताच शब्द पाणीकपात,
साठवा पाणी नाहीतर लागेल आपलीच वाट.
पाणीकपात पाणीकपात जाहीर झाली पाणीकपात,
ड्रम पिंप सारे भरले, शिवाय वाट्या-भांडी, आणि कपात.