हवंय काय या मनाला????

खरच कळत नाही मला हवंय काय या मनाला…..
क्षणात खोल सागरी तर क्षणात गवसणी गगनाला..

पंख पसरून उडतंय कधी उंच उंच आभाळी…
कधी कटलेल्या पतंगाबरोबर खाते गटांगळी….

असते कधी शूर वीर बाजीराव रणीचा….
तर कधी बनते दासही कोण्या दासाचा….

काय हवाय ते कळतंय का मनाचा तरी मनाला..
का विचारताय ते उगीच आपला याला त्याला????

6 thoughts on “हवंय काय या मनाला????

  1. He matra khar aahe nice 1 manacha thang lagat nahi..shodhat jav tevadha tal dur dur rahat jato..

Leave a Reply

%d bloggers like this: