Your cart is currently empty!
कुंपणच शेत खातंय, अन साळसूद आव आणतंय,
खाल्लेलं शेत मात्र, ओठांवर स्पष्ट दिसतंय.
एक शेत खाऊन संपलं, कुंपण मग सफरीला लागलं,
जिथे नवं शेत दिसतंय, कुंपण तिथे मुक्काम मांडतय.
तिथे ही कुंपण हळू हळू, शेताला बघा लागलंय गिळू,
शेत सगळं खाऊन संपलं, कुंपणाच पोट तुडूंब भरलं.
“चला थोडे येऊ फिरून”, कुंपण निघे पोट सावरून,
चालून चालून जेवण पचलं, कुंपणानी नवं शेत शोधलं.
एक एक शेत खातांना, कुंपण एक मात्र विसरतय,
सगळंच खाऊन टाकलं तर, कुंपणच उपाशी मरतंय…..
Discover more from Adi's Journal
Subscribe to get the latest posts sent to your email.
Comments
7 responses to “खादाड कुंपण”
cool….jamliye ha…
Its really cool…………
Same time it sings the corruption in INDIA……..
Hope every political person will some day visit this page……….sensible..
sahi na…… kadhi kelis ??????
wow!!
एक एक शेत खातांना, कुंपण एक मात्र विसरतय,
सगळंच खाऊन टाकलं तर, कुंपणच उपाशी मरतंय…this line is touchy!!
Superb man…..ekach number…..kammal jamliye kavita…….
>>एक शेत खाऊन संपलं, कुंपण मग सफरीला लागलं,
जिथे नवं शेत दिसतंय, कुंपण तिथे मुक्काम मांडतय.अगदी लवासाची आणि मुळशीत होऊ घातलेल्या आणखी अशाच प्रकल्पाची आठवण झाली रे.
Leave a Reply