खादाड कुंपण

कुंपणच शेत खातंय, अन साळसूद आव आणतंय,
खाल्लेलं शेत मात्र, ओठांवर स्पष्ट दिसतंय.

एक शेत खाऊन संपलं, कुंपण मग सफरीला लागलं,
जिथे नवं शेत दिसतंय, कुंपण तिथे मुक्काम मांडतय.

तिथे ही कुंपण हळू हळू, शेताला बघा लागलंय गिळू,
शेत सगळं खाऊन संपलं, कुंपणाच पोट तुडूंब भरलं.

“चला थोडे येऊ फिरून”, कुंपण निघे पोट सावरून,
चालून चालून जेवण पचलं, कुंपणानी नवं शेत शोधलं.

एक एक शेत खातांना, कुंपण एक मात्र विसरतय,
सगळंच खाऊन टाकलं तर, कुंपणच उपाशी मरतंय…..

Continue Reading