पुतळ्यांचे आंदोलन

चौकाचौकातले पुतळे एकदा, रामलीलेवर जमले.
मागण्यांसाठी त्यांच्या त्यांनी, आंदोलन छेडले.
म्हटले सारे एकमुखांनी, पुरे हा अत्याचार.
एक दिसाच्या कौतुकाचा, थांबवा भडीमार.
त्यादिवशीच्या हार तुऱ्यांनी, झालोत बेजार.
आमच्या जन्म मृत्यूचा, मांडला की बाजार.
आदल्या दिवशी सफाईची, ये तुम्हालाच उर्मी.
पाण्याच्या त्या माऱ्यानी तुम्ही, घालवता गर्मी.
अंगावरती बागडती हो नानाविध पक्षी.
सोबत होती जरी करिती ते विष्ठेची नक्षी.
दोन क्षणांच्या अंघोळीने सफाई तर झाली,
स्नेह्यांपासून दुरावण्याची शिक्षाही झाली.
दुसऱ्या दिवशीच्या भाषणांनी तुमची मते भरली
आमच्या नशिबी मात्र पुन्हा एकाकी रात्र आली
1

Discover more from Adi's Journal

Subscribe to get the latest posts sent to your email.


Comments

3 responses to “पुतळ्यांचे आंदोलन”

  1. nice

    1. chhan aahe. Baray putala euoopian distoya.

  2. Great…apratim kalpakata….

Leave a Reply