जीवनाचा प्रवास कसा
वळणे घेत चालतो,
हिरवेकंच रान कधी,
वाळवंटी नेतो.
प्रवासाची खूप न्यारी
असते अशी एक गम्मत,
सार्या लांब प्रवासात
जिद्द चिकाटीच सोबत.
कधी सुखाच्या किरणांनी
होतो सूर्योदय तेव्हाचा,
केव्हा कधी ठाव घेतो
उदास सूर्यास्त मनाचा.
अनुभव शिदोरी गोळा करत
प्रवास हा चालतो,
श्वासांचं इंधन संपलं की
शेवटचा मुक्काम पडतो.
Leave a Reply